Republic Day 2023 : कोण आहेत पार्थ कोठेकर, ज्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे डूडल तयार केले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day 2023

Republic Day 2023 : कोण आहेत पार्थ कोठेकर, ज्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे डूडल तयार केले?

Republic Day 2023 : ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, सर्च इंजिन गुगलने हँड कट पेपरवर कलेचे चित्रण करणारे अनोखे डूडल तयार करून देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. हे डूडल कागदावर हाताने बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रतिबिंब दिसते.

हेही वाचा: Republic day 2023 : पूर्वी फक्त 'राजा'च राजपथवरुन जायचा, जाणून घ्या अनोखा इतिहास

विशेष बाब म्हणजे गुगल या सर्च इंजिनचे हे डूडल त्यांच्याच देशातील होतकरू कलाकार पार्थ कोठेकर यांनी बनवले आहे, पार्थ हा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी आहे आणि हाताने कापलेल्या कागदावर कला दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेस्ट आर्टिस्ट म्हणून त्यांनी गुगलसाठी हे डूडल बनवले आहे.

हेही वाचा: Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या गोष्टींवर बंदी, खिशात पेन सुद्धा नाही नेता येणार

कोण आहे पार्थ कोठेकर

पार्थ कोठेकर याचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. तो त्याच्या पेपरकट आर्टवर्कसाठी ओळखला जातो, तो कागदाच्या एका शीटवर हाताने अनेक भिन्न डिझाइन तयार करू शकतो. विशेष म्हणजे तो फार शिकलेला नाही. जानेवारी 2021 मध्ये 'इट माय न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की तो अभ्यासात कधीच हुशार नव्हता. त्यामुळेच हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी अॅनिमेशन शिकण्यावर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा: Republic Day 2023 : लष्करातून राजीनामा देत बनले राष्ट्रपती, कोण आहे प्रजासत्ताक दिनाचे खास पाहुणे?

… अॅनिमेशनचा अभ्यास सोडला होता

पार्थ कोठेकरच्या म्हणण्यानुसार, एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना त्याने थ्रीडी अॅनिमेशनचा अभ्यास अर्धवट सोडला. त्याला दुसऱ्या कलाप्रकारात रस असल्यामुळे अॅनिमेशनचा अभ्यास मधेच सोडून त्यांनी संपूर्णपणे स्केचिंगमध्ये लक्ष केंद्रित केले आणि या कलेचा आनंद घेत गेला.

हेही वाचा: Auto Tips : मारुती Alto पेक्षा स्वस्त! टाटांची ही हॅचबॅक केवळ 3 लाखांमध्ये उपलब्ध

अशी ओळख मिळाली

पार्थ कोठेकर यांनी सुरुवातीला छंद म्हणून ही कलाकृती केली, पण हळूहळू तो त्यांचा व्यवसाय बनला. पार्थच्या म्हणण्यानुसार, त्याने पहिल्यांदा अहमदाबादमधील कनोरिया कॉर्नर येथे प्रदर्शन भरवले. यामध्ये त्यांनी आपले काम लोकांना दाखवले. जे लोकांना आवडले. त्यामुळे त्यांना देश-विदेशात ओळख मिळू लागली आणि हँड पेपर कट आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख होऊ लागली.

हेही वाचा: Travel Tips : लहान मुलांसोबत प्रवास करताय? टेन्शन नॉट या खास टिप्स करा फॉलो

न्यूझीलंड सरकारने निमंत्रण दिले आहे

लंडनच्या नॅशनल हिस्ट्री म्युझियममध्येही पार्थ कोठेकर यांचे चित्रण पाहायला मिळते. पार्थच्या म्हणण्यानुसार, ही कलाकृती Adobe च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी Behance ने बनवली आहे. यापूर्वी 2016 मध्ये पार्थला न्यूझीलंड सरकारकडून त्याची कलाकृती दाखवण्यासाठी आमंत्रणही मिळाले होते. पार्थ कोठेकर यांच्या वेबसाईटनुसार त्यांच्याकडे अनेक पेपर वर्क आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. न्यूझीलंड, दुबईसह अनेक देशांमध्ये त्यांनी आपली कला प्रदर्शित केली आहे.

हेही वाचा: Heart Attack : 'या' तीन चुकीच्या गोष्टीमुळे कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; हे वाचाच

डूडलमध्ये काय दाखवले होते

सर्च इंजिन गुगलच्या या डूडलमध्ये ऐतिहासिक इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, नॉर्थ आणि साउथ ब्लॉकही दिसत आहेत. विशेष म्हणजे या डूडलमध्ये तरुण आणि घोडेस्वारांना बाइकवर स्टंट करताना दाखवून परेडचे प्रतिबिंबही दाखवण्यात आले आहे. फुलांच्या आकाराचे आकृतिबंध त्याला अधिक खास बनवत आहेत.