Republic Day 2023 : कारगील युद्धात शत्रुचा वार छाताडावर झेलणारे सतवीर सिंह यांचे ते शेवटचे पत्र !

सप्टेंबरपर्यंत माझी रजा मंजूर होईल आणि मी घरी येईन
Republic Day 2023
Republic Day 2023Esakal

'आदरणीय आई... वडिलांना आशिर्वाद. सर्वजण कसे आहात? मी आजच बहिण सुशीला हिला पत्र पाठवले आहे. माझी काळजी करू नका. मी इथे ठीक आहे. 16 तारखेचे वर्तमानपत्र जरूर वाचावे. जी घटना घडली, ते सर्व शहीद माझ्या युनिटचे होते.

आता फारसा धोका नाही. जवळपास शांतता आहे. जेव्हा परिस्थिती पूर्णपणे ठीक होईल तेव्हाच मी रजेसाठी अर्ज करेन. सप्टेंबरपर्यंत माझी रजा मंजूर होईल आणि मी घरी येईन. बाबा तुमची तब्येत कशी आहे? पत्राचे उत्तर लवकर द्या.

हे पत्र आहे 2-राजपुताना रायफल्सचे नाईक सतवीर सिंग यांनी 19 जून 1999 रोजी कारगिल युद्धादरम्यान आपल्या आई वडिलांना उद्देशून लिहिले होते. तोलोलिंगवर ताबा मिळवण्याच्या नादात दिल्लीच्या मुखमेलपूर गावात राहणाऱ्या या शूरवीराने शत्रुच्या गोळ्या झेलल्या. त्यांच्या पायात अजूनही गोळीची जखम आहे. यामुळे त्यांना नीट चालताही येत नाही.

Republic Day 2023
Vijay Divas 2022: मध्यरात्री इंदिरा गांधींनी केली युद्धाची घोषणा... अन् पाकिस्तानचे झाले दोन तुकडे

सतवीर सिंग यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच 'जय जवान, जय किसान'चे महत्त्व त्यांना पटले होते. एका रॅलीत त्यांनी पहिल्यांदा भारतीय तिरंगा हातात घेतला तेव्हा ते फक्त पाच वर्षांचे होते. लहान वयात जेव्हा कोणी त्यांना विचारायचे की, मोठा झाल्यावर काय बनायचं आहे. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ते उत्तर द्यायचे की मी सैन्यात भरती होईन.

Republic Day 2023
Jaswant Singh : शौर्यगाथा!... जेव्हा भारतीय जवानाने 72 तासात चीनच्या 300 जवानांना ढगात धाडले

सतवीर सिंग मोठ्या उत्साहाने शाळेच्या परेडमध्ये भाग घ्यायचे. सैन्यासाठी तयार होण्यासाठी तो एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) मध्ये देखील सामील झाले. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना जास्त अभ्यास करता आला नाही. लष्करात भरती होण्यापूर्वी त्यांनी सुमारे अडीच वर्षे भारतीय होमगार्डमध्ये सेवा बजावली.

Republic Day 2023
Republic Day 2023 : मृत्यूपश्चातही देशसेवा करणारे बाबा हरभजन सिंग; स्वप्नात येऊन सैनिकांना सांगतात चीनच्या कुरघोड्या!

सतवीर सांगतात की, कारगिल युद्धादरम्यान ते 13 जून 1999 रोजी सकाळी ते सैन्याच्या तुकडीसोबत कारगिलच्या टोलोलिंग टेकडीवर होते. ते सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत २४ सैनिक होते. त्यापैकी सात शहीद झाले. तर, बाकीच्यांना गंभीर दुखापत झाली.

Republic Day 2023
Kargil War: कारगील युद्धाची आठवण करून देतात हे चित्रपट

युद्धाबद्दल सतवीर सिंग म्हणतात की, शत्रूवर वार करण्यासाठी मी  शांत डोक्याने विचार केला. कोणतीही हालचाल न करता. शत्रुला जवळ येऊ दिले. आमच्या बाजूने आवाज येत नाही म्हणल्यावर शत्रू बिंधास्त झाला आणि ते आमच्या ठिकाणाच्या जवळ आले. त्याचक्षणी मी त्यांच्यावर तुटून पडलो. शत्रुला धूळ चारालया मी त्यांच्यावर हँडग्रेनेडने हल्ला केला.

Republic Day 2023
Kargil Vijay Divas : कारगिलच्या थराराची २२ वर्षे; देशभर शहीदांचे स्मरण

ती योजना कामी आली. मी फेकलेल्या ग्रेनेडचा स्फोट होताच पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले. मात्र, या संघर्षात शत्रूची गोळी सतवीरसिंग यांच्या पायाच्या टाचेला लागली. त्याची खूण आजही त्याच्या पायात आहे.

सतवीर सिंह यांना शत्रुच्या गोळ्यांनी झालेली जखम
सतवीर सिंह यांना शत्रुच्या गोळ्यांनी झालेली जखमEsakal
Republic Day 2023
Kargil War : कॅप्टन विक्रम बत्रांची जगातील सर्वात मोठी अंडर वॉटर प्रतिमा; पाहा Video

सतवीरजी सुमारे १७ तास टेकडीवर जखमी अवस्थेत पडून होते. त्याच्या शरीरातून खूप रक्त वाहत होते. शत्रू मागे गेल्यावर त्याच्या साथीदारांनी त्याला उचलून सुरक्षितस्थळी आणले. नंतर त्यांना एअरबसने श्रीनगरला आणण्यात आले. त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली.

Republic Day 2023
Vijay Divas 2022 : पाणीपुरी विकता विकता अभ्यास केला; सामान्य मुलगा हवाई दलात पायलट झाला

सतवीर यांना 14 जून 1999 रोजी लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना 23 मे 2000 रोजी चालता येत नसल्याने त्यांना सेवानिवृत्ती देण्यात आली होती. सतवीर यांना त्यांच्या या धाडसाबद्दल भारत सरकारने सेवा विशेष पदक प्रदान केले.

Republic Day 2023
Vijay Divas 2022 : 1971 च्या विजयानंतरचे हे दूर्मिळ फोटो तुम्ही बघितले का?

कारगिल युद्ध २६ जुलै १९९९ रोजी भारताच्या विजयाने संपले. त्यानंतर तत्कालीन सरकारने या युद्धात शहीद झालेल्या अधिकारी, सैनिकांच्या विधवा आणि जखमी सैनिकांना पेट्रोल पंप आणि शेतजमीन देण्याची घोषणा केली होती. या यादीत सतबीरचेही नाव होते. पण दुर्दैवाने त्यांना पेट्रोल पंप मिळू शकला नाही. त्यांना सुमारे 5 एकर जमीन देण्यात आली. ती मंजून होऊन हातात यायला 3 वर्ष लागली.

सतबीरजींनी परिवाराला लिहीलेले ते पत्र सैन्यातील शेवटचेच ठरले. कारण, त्यानंतर काहीच दिवसात ते कायमचेच सुट्टीवर आले. अशा परिस्थितीत कारगिलच्या या हिरोला घर चालवण्यासाठी ज्यूस सेंटर चालवावे लागले. सैन्यातील पेन्शन आणि दुकानाच्या जोरावर सतबीरजी आपल्या दोन मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह करत आहे. त्याला योग्य तो सन्मान मिळाला नाही. याचीच त्यांना खंत वाटतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com