
बजरंग दल आणि भाजप युवा मोर्चाचा सदस्य रिंकू शर्माच्या हत्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. दिल्लीतील मंगोलपुरी भागात बुधवारी सहा जणांनी त्याची हत्या केली होती.
नवी दिल्ली - बजरंग दल आणि भाजप युवा मोर्चाचा सदस्य रिंकू शर्माच्या हत्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. दिल्लीतील मंगोलपुरी भागात बुधवारी सहा जणांनी त्याची हत्या केली होती. एका कार्यक्रमात झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. रिंकूच्या हत्येमुळं दोन समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, अशीही माहिती समोर येत आहे की, रिंकूच्या हत्या प्रकरणात ज्याचं नाव आहे त्याच्या पत्नीला रिंकूने रक्तही दिलं होतं.
मृत रिंकू शर्मा सामाजिक कार्यात सक्रिय होता. त्यातच समोर येतंय की हत्येचा प्रमुख आरोपी असणाऱ्या इस्लामच्या पत्नीला रिंकूने गरजेच्यावेळी आपलं रक्त दिले होते. आज त्याच इस्लामने आणि त्याच्या मित्रांनी रिंकूचं रक्त सांडलं आहे. माहितीनुसार, रिंकू शर्माच्या रक्ताने संपूर्ण खोली भरुन गेली होती. तो प्रसंग अत्यंत भयानक होता. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हे वाचा - Rinku Sharma Murder: बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या पाठीत आरपार खुपसला चाकू; परिसरात तणाव
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपी इस्लामची पत्नी दिड वर्षांपूर्वी गरोदर होती. रिंकुच्या शेजाऱ्यानेच याबाबत खुलासा केला आहे. बाळंतपणावेळी इस्लामच्या पत्नीची तब्येत अधिक बिघडली होती. यावेळी तिला रक्ताची आवश्यकता होती. अशावेळी रिंकू शर्माने इस्लामच्या पत्नीला रक्त दिले होते. एवढेच नाही तर रिंकू शर्माने इस्लामच्या भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकूच्या भावाच्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय मनु शर्माने म्हटलंय की, तो आई-वडील आणि भावासोबत मंगोलपूरी स्थित ब्लॉकमध्ये राहतात. मनुने आरोप केलाय की, घरापासून जवळच दानिश उर्फ लाली, इस्लाम, मेहताब उर्फ नाटू आणि जाहिद उर्फ छिंगू राहतात. रिंकू शर्मा आणि या चौघांमध्ये दसऱ्याच्या दिवशी राम मंदिर पार्कमधील कार्यक्रमावरुन वाद झाला होता. मनुचे म्हणणे आहे की, तेव्हापासून त्याच्या भावाला धमक्या मिळत होत्या.
टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे...
एफआयरनुसार, दानिश आपले मित्र इस्लाम, मेहताब, जाहिद यांच्यासोबत बुधवारी रात्री १०.३० वाजता रिंकुच्या घरासमोर आला. सगळ्यांच्या हातात शस्त्र होते. त्यांनी घराबाहेर येत शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रिंकू आणि इस्लाममध्ये वाद सुरु झाला. मेहताबने रिंकूवर तलवारीने हल्ला केला. चाकू रिंकूच्या पाठीत पूर्णपणे खुपसण्यात आला. जखमी झालेल्या रिंकूला मनुने संजय गांधी हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला. पोलिसांनी चाकू जप्त केला आहे.