कोरोनाच्या संपर्कात आणणाऱ्या सर्वात धोकादायक गोष्टी कुठल्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus
कोरोनाच्या संपर्कात आणणाऱ्या सर्वात धोकादायक गोष्टी कुठल्या?

कोरोनाच्या संपर्कात आणणाऱ्या सर्वात धोकादायक गोष्टी कुठल्या?

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Corona virus third wave) सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटमुळं दिवसेंदिवस कोरोनाच्या संसर्गबाधितांची संख्या वाढतेय. पण तुम्हाला माहिती आहे का? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळं कोरोनाच्या सर्वाधिक संपर्कात येण्याचा धोका तुम्हाला असतो. एका अभ्यासातून या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (Riskiest Activities that expose you to COVID 19 Finds Study)

हेही वाचा: 12 आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

(Virus Watch Study: Non-household activities COVID risk, 20 December 2021) ‘व्हायरस वॉच स्टडी : नॉन-होमहोल्ड अ‍ॅक्टिव्हिटीज COVID रिस्क' या शिर्षकाखाली अभ्यासाचा अहवाल ७ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासाचं अद्याप सखोल पुनरावलोकन होणं बाकी आहे. पण यातील निष्कर्षांनुसार, स्वतः खरेदीसाठी घराबाहेर पडणं, कामानिमित्त प्रवास करणं, रेस्तराँमध्ये जेवणासाठी जाणं, सार्वजनिक वाहतूकीच्या वाहनांचा वापर करणं, खेळ तसेच इनडोअर आणि आउटडोअर पार्टीजमध्ये भाग घेणं हे संसर्गाला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरु शकतं.

खरेदीसाठी बाजारात जाणं ही सर्वात मोठी चूक

अभ्यासानुसार, निर्बंध लादलेल्या आणि कोणतेही निर्बंध नसलेल्या काळात खरेदीसाठी बाहेर जाणं हे संसर्गासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान असल्याचं दिसून आलं आहे. जे लोक आठवड्यातून दोनदा वैयक्तिक खरेदीसाठी घर सोडतात त्यांना इतरांपेक्षा विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

पार्टी, खेळांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणंही धोकादायक

संशोधकांनी हे निदर्शनास आणून दिलंय की, क्रीडा कार्यक्रमांसह सामाजिक कार्यक्रम देखील व्हायरल संसर्गाला अधिक चालना देऊ शकतात. त्यामुळंच मोठ्या मेळाव्यामध्ये किंवा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याविरुद्ध तज्ज्ञांनी अनेकदा इशारा दिला आहे.

थिएटर्स, ब्युटी पार्लर, सलूनपासून किती धोका?

अभ्यासानुसार, सिनेमा थिएटर, मैफिली किंवा ब्युटी सलूनमध्ये हजेरी लावल्याने कोरोनाची लागण होण्याची जोखीम किती असते. याबाबत अद्याप कोणताही पुरावा या संशोधनातून समोर आलेला नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top