'एकमेकां साह्य करू'; भारत-चीनचा निर्धार!

वृत्तसंस्था
Sunday, 13 October 2019

भारत आणि चीनदरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वुहान स्पिरीटचा दाखला देताना चेन्नई कनेक्‍टचा पुनरुच्चारही केला.

मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्य करावे, अशी भावनाही उभय नेत्यांनी व्यक्त केली.

भारत आणि चीन दरम्यान शनिवारी (ता.12) दुसऱ्या टप्प्यातील अनौपचारिक चर्चा पार पडली. या चर्चेचा तपशील परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माध्यमांसमोर मांडला. 

- 500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर

भारत आणि चीनदरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वुहान स्पिरीटचा दाखला देताना चेन्नई कनेक्‍टचा पुनरुच्चारही केला. व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नवी व्यवस्था तयार करण्यावर उभय देशांचे मतैक्‍य झाले. प्रादेशिक सर्वसमावेश आर्थिक भागीदारीबाबत भारताच्या चिंता चीनने मान्य केल्या असून, याबाबत चर्चेचीही तयारी दर्शविली आहे.

वैश्‍विक व्यापार व्यवस्थेवर आधारित नियमांचे महत्त्व मोदी आणि जिनपिंग यांनी मान्य केले. महत्त्वाच्या अशा प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आग्रही मत दोन्ही नेत्यांनी मांडले. शी यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचाही मुद्दा उपस्थित केल्याचे गोखले यांनी सांगितले. 

- Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे

काश्‍मीरचा उल्लेख नाही 

दहशतवादाने दोन्ही देशांसमोर मोठी आव्हाने उभी केली असून, त्यांचा एकत्रितरीत्या सामना केला जावा, यावर दोन्ही नेत्यांचे मतैक्‍य झाले; पण या चर्चेमध्ये कोठेही काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही, असे गोखले यांनी नमूद केले. दोन्ही देशांच्या शिष्टमंडस्तरीय चर्चेनंतर मोदी आणि जिनपिंग यांच्यातही संवाद झाला. दोन दिवसांच्या अवधीत मोदींनी जिनपिंग यांच्याशी साडेपाच तास चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनसोबत अर्थपूर्ण संवाद सुरू केला होता, त्यांनी 1988 मध्ये चीनला भेट दिल्यानंतर हे मैत्रीपर्व सुरू झाले होते. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' सरकारने ते परस्पर सामंजस्याच्या पातळीवर नेले. 
- आनंद शर्मा, प्रवक्ते काँग्रेस

- Vidhan Sabha 2019 : जय पवार आणि भाजप कार्यकर्ते आले समोरासमोर; पाहा काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roadmap for Better India and China relations