
न्यूयॉर्क : अमेरिका आणि अन्य बड्या युरोपियन देशांतील कोरोना विषाणूचा उद्रेक आता नियंत्रणात आला असतानाच रशिया आणि पाकिस्तानमधील स्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
चीनला दिलासा
चीनमधील संसर्ग घटला असून बीजिंगमध्ये व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. उत्तर आणि दक्षिण कोरिया सामूहिक संसर्गापासून बचावले असून येथील आर्थिक चक्रे गतिमान होणार आहेत. फ्रान्स, जर्मनी, स्पेनमधील कारखाने कार्यालये पुन्हा सुरू होणार असून येथील संसर्ग कमी झाला आहे.
लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी गडकरींचा सल्ला; म्हणाले...
मॉस्कोला तडाखा
रशियात आज ७ हजार ९३३ जणांना संसर्ग झाला असून एकूण बाधितांची संख्या १ लाख १४ हजार ४३१ वर पोचली आहे. ही आकडेवारी प्रत्यक्षात खूप अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियातील पाच राज्यांना याचा मोठा फटका बसला असून मॉस्कोमध्ये हा संसर्ग उच्चांकी पातळीवर गेला आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून त्यांना मंत्रीमंडळाच्या बैठका घेणे थांबविले आहे.
पाकला फटका
पाकिस्तानमध्ये आणखी १ हजार २९७ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून येथील एकूण बाधितांचा आकडा लवकरच २० हजारांवर जाऊ शकतो. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशांतील चाचण्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढू शकते.
देशातील ही आहेत टॉप टेन कोरोनाग्रस्त राज्ये
न्यूयॉर्कमधील शाळा बंद
अमेरिकेत टेक्सास, दक्षिण कॅरोलिना राज्यांतील हॉटेल दुकाने, उद्योग सुरू होणार असून न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू क्यूओमो यांनी मात्र राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुढील वर्षभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क हे शहर कोरोनाच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असून येथील तीन लाखांपेक्षाही अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून २३ हजारांपेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत.