...तर सर्वच मुस्लीम शहरांची नावं बदला; अबु आझमींची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abu Azami

...तर सर्वच मुस्लीम शहरांची नावं बदला; अबु आझमींची मागणी

नवी दिल्ली : ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलण्यात आली होती. त्यावर आज शिंदे सरकारने शिक्कामोर्तब केले असून, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. या नामांतराच्या वादात आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी (Abu Azami) यांनी उडी घेत नवीन मागणी केली आहे. यावेळी त्यांनी नामांतराच्या मुद्यावरून मविआघा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. (Abu Azami News In Marathi)

हेही वाचा: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांचे मत

आझमी म्हणाले की, शहरांची नावे बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावे बदण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, शहरांची नावं बदलणं म्हणजे केवळ ढोंगीपणा असल्याची टीकादेखील आझमी यांनी केली आहे. देशात खूप मोकळी जमीन अस्तित्वात असून, त्याठिकाणी नवीन शहरांची निर्मीती करून सरकारने त्यांना हवी तशी नावं द्यावी अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. मात्र, ही नावं देताना मुस्लीम नाव चालणार नाही असा संदेशदेखील त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

हेही वाचा: PM मोदींच्या मोफत रेवडी विधानावर केजरीवालांचा पलटवार; म्हणाले...

शहरांची नावं बदल्याने जर देशाचा विकास होणार असेल, लोकांना नोकरी मिळणार असेल, भूक मिटणार असेल, महागाई कमी होणार असेल, तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावे बदला अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा: Google, Facebook ला द्यावा लागणार बातम्यांचा मोबदला

जलील यांचाही हल्लाबोल

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. औरंगाबादचं नामकरण केलं, मात्र औरंगाबादकरांना ८ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार असा सवाल जलील यांनी सरकारला केला आहे. याआधी जलील यांनी नामांतराला विरोध करण्यासाठी औरंगाबादेत भर पावसात मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत नामांतरामुळे येणाऱ्या पिढ्या आम्हाला विचारतील की, औरंगाबादचे नामांतर होत असताना तुम्ही काय करत होता, असंही जलील यांनी म्हटलं होतं.

Web Title: Samajwadi Party Leader Attack On Aurangabad City Name Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top