esakal
देश
Sambhal Controversy: खासदाराच्या घरी मीटर बसवायला सोबत आले पोलीस, कारण काय?
Sambhal : समाजवादी पार्टीच्या खासदाराच्या निवासस्थानी वीज मीटर बसवण्यात आलं. यावेळी वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत आहे.
उत्तर प्रदेशातील संभल जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संभल मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी गेल्यानंतर ४६ वर्षे बंद असलेलं मंदिर उघडण्यात आलं. आता समाजवादी पार्टीच्या खासदाराच्या घरी वीज मीटर लावण्यासाठी वीज विभागाची टीम दाखल झाली. त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही होता. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात खासदाराच्या घरी वीज मीटर बसवण्यात आलं.

