Sanjay Arora : वीरप्पन टोळीविरुध्द कारवाई करणाऱ्या संजय अरोरांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Arora

संजय अरोरा हे दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत.

Sanjay Arora : वीरप्पन टोळीविरुध्द कारवाई करणाऱ्या संजय अरोरांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

संजय अरोरा (Sanjay Arora) हे आता दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त (Commissioner of Delhi Police) असणार आहेत. ते राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांची जागा घेतील. 1988 च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे IPS संजय अरोरा हे ITBP चे महासंचालक देखील राहिले आहेत. संजय अरोरा यांनी 1997 ते 2000 या काळात उत्तराखंडमधील मातली इथं आयटीबीपीच्या बटालियनचं नेतृत्व केलंय.

IPS संजय अरोरा यांनी मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जयपूर (राजस्थान) येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली होती. आयपीएस झाल्यानंतर, त्यांनी तामिळनाडू पोलिसांत विविध पदांवर काम केलं. ते विशेष टास्क फोर्सचे पोलिस अधीक्षक (एसपी) होते. जिथं त्यांनी वीरप्पन टोळीविरुद्ध महत्त्वपूर्ण यश मिळवलं. शौर्याबद्दल अरोरांना मुख्यमंत्री शौर्य पदक प्रदान करण्यात आलंय.

1991 मध्ये संजय अरोरा यांनी NSG मधून प्रशिक्षण घेतलं. यानंतर, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या विशेष सुरक्षा गटाच्या (एसएसजी) निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वास्तविक, त्या काळात LTTE च्या कारवाया शिगेला होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणूनही पदभार स्वीकारला. निमलष्करी दलात प्रतिनियुक्तीवर, कमांडंट पदावर आलेल्या काही आयपीएसपैकी संजय अरोरा हे एक आहेत. संजय अरोरा यांनी 1997 ते 2002 या काळात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये कमांडंट म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केलंय. संजय अरोरा यांना 2004 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक, 2014 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस विशेष कर्तव्य पदक आणि संयुक्त राष्ट्र शांती पदक यासह इतर पदकांनी सन्मानित करण्यात आलंय.

टॅग्स :Delhi PoliceIPS