'पेगासस'ला भारतातील फोन टॅपिंगसाठी मिळाले 'इतके' कोटी!

'पेगासस'ला भारतातील फोन टॅपिंगसाठी देण्यात आले 'इतके' कोटी! संजय राऊतांनी फोन टॅपिंग प्रकरणावर व्यक्त केलं 'रोखठोक' मत Sanjay Raut alleges BJP Modi Govt close ones gave Pegasus 350 crores for Phone Tapping and hacking
Pegasus-Phone-Hacking
Pegasus-Phone-HackingSakal

नवी दिल्ली: 'राजकारण किती गढूळ झाले आहे याचे दर्शन आता रोजच होत आहे. दिल्लीत ते जरा जास्तच होत असते. राजकारणात स्वतःची सावलीही अनेकदा आपली नसते. असे गूढ वातावरण आपल्याभोवती निर्माण झाले आहे', असं पेगासस प्रकरणाचं वर्णन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून केलं. त्यानंतर रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी 'पेगासस'ला भारतातील हेरगिरीसाठी ३५० कोटी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

Pegasus-Phone-Hacking
कुंद्राचं गुप्त कपाट उलगडणार सर्व 'राज'?
sanjay raut
sanjay rautsakal

"राजकारणात हेरगिरी करणं हे काही नवीन नाही. पेगाससबाबत संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हेरगिरी नवीन नसली तरी भारतात अशा घटना आता वारंवार होत आहेत. हे कोण करत आहे? विरोधकांची कोणाला इतकी भीती वाटते आहे? याचा खोलवर तपास करणे गरजेचे आहे. पेगाससला भारतातील ३०० फोन टॅपिंग आणि हॅकिंगसाठी सुमारे ३५० कोटी रूपये देण्यात आले. हे पैसे सरकारी खात्यातून गेले नसतील तर हे पैसे कोणी दिले? कोणाच्या खात्यातून ही रक्कम वळती करण्यात आली? यामागे कोण आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे", असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.

Pegasus-Phone-Hacking
राणे-फडणवीसांचा कोकण दौरा; पूरग्रस्त भागाची पाहणी

कोकण आणि रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे चिपळूण आणि महाडमध्ये पूरस्थिती उद्भवली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आणि दौरा केला. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की गेल्या वेळी जो सांगलीत पूर आला होता त्यावेळी मदत देण्यास उशीर झाला होता. त्यापेक्षा लवकर मदत मिळाली आहे. मदत मिळते की नाही यावर स्वतः मुख्यमंत्र्यांचा लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com