शेतकरी, मजुरांना सरकाराने पगार द्यावा माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

शेतकरी, मजुरांना सरकाराने पगार द्यावा माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

कऱ्हाड : शेतकरी, अल्पभुधारक व सुक्ष्म उद्योजक क्षेत्रातील मजुरांना ठराविक रक्कम पगार थेट त्यांच्या खात्यावर द्यावी, कॉग्रेस पक्ष त्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे केंद्र सरकाराने त्याचे निश्चीत धोरण आखणे गरजेचे आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 10 लाख कोटींची तरतूदही त्यांनी केली पाहिजे. मात्र केंद्र सरकारची ती मानसिकता दिसत नाही. त्यामुळे त्यांनी मजुरांना सोडले तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे देशात आराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील, अशी घणाघाती टिका माजी मुख्यंमत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आमदार चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरसीव्दारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे पोकळ वासा आहे, अशी टिका करून आमदार चव्हाण म्हणाले, केंद्राच्या आत्ताच्या पॅकेजमध्ये केवळ घोषणांचा पाऊस आहे. प्रत्यक्षात हाती काहीच नाही, अशी स्थिती आहे. जे द्यायचे आहे. ते कर्ज स्वरूपात देणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पॅकेजची रचना पुन्हा नव्याने करावी. त्यामध्ये सुक्ष्म उद्योजक क्षेत्रातील कामगारांसह शेतकऱ्यांना थेट जास्तात जास्त रक्कम द्यावी. अर्थमंत्र्यांवर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यांना ते झेपलेले नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचा काहीही होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगा योजनेची खिल्ली उडवली होती. त्यांच्या मागील क्लीप काढून पहाव्यात मात्र आत्ताच्या वेऴेला मनरेगाच अर्थ व्यवस्थेला तारू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी कॉग्रेसचीच नव्हे तर देशाची दिलगीरी व्यक्त करण्याची गरज आहे. 

शेतकरी, अल्पभूधारक आणि सुक्ष्म उद्योजक क्षेत्रातील मजुर यांच्या खात्यावर थेट पैसे पोचले पाहिजेत, यासाठी कॉग्रेस आग्रही आहे, असे सांगून आमदार चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ज्या योजना देणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यातही फसवेगिरी आहे. कर्ज स्वरूपात योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तो त्रासदायक आहे. शेतकरी आत्ता आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना आर्थिक झळ सोसावी लागलेली आहे. अशा स्थितीत थेट मदत देण्याएवजी केंद्र सरकारने कर्ज स्वरूपात मदतीचे अश्वासन देत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या जखमेवरच मीठ चोळत आहे. अस न करता शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याची योजना आखली गेली पाहिजे. अन्विक व अंतरिक्षक यावर आत्ता होणारा खर्च अनावश्यक आहे. तो टाळून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह अल्प भूधारकांना थेट पैसे देण्याची गरज आहे. देशात मागणी पूर्णपणे कोसळली आहे. त्यामुळे पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. अशावेळी साखळीतील शेतकरी महत्वाचा घटक आहे त्यांना पगार स्वरूपात थेट आर्थिक मदत देणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय सुक्ष्म उद्योजक क्षेत्राला त्याचा लाभ होण्याची गरज आहे. त्या मजुरांनाही शेतकऱ्यांप्रमाणेच थेट पैसे देण्याची गरज आहे. दोन्ही अर्थव्यवस्थेची मुख्य चाके आहेत. मात्र त्यांची स्थिती सुधारली पाहिजे, मात्र असे केंद्र सरकारकडून होताना दिसत नाही. किंबहुना त्यांची ती मानसिकातही दिसत नाही. इंग्लड, अमेरिका व जर्मन यांनी थेट सुक्ष्म उद्योजक क्षेत्रातील कामागारंच्या खात्यावर पैसे देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यांची रक्कम कितीतरी पटीने जास्त आहे. इग्लंडने 2500 पैंड म्हणजेच सव्वा दोन लाख, जर्मनीने कामगारांचा 60 टक्के पगार सरकार करेल असे जाहीर करत त्यासाठी 100 युरो डॉलरची तरतूदसकेली आहे. अमेरिकेने 1200 डॉलर्स थेट कामगारांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या तुलनेत भारताच्या केंद्र सरकारची योजनावकाहीच नाही. शेतकऱ्यांसह अन्य सुक्ष्म उध्योग क्षेत्रातील कामगारांना पैसे देण्यासाठी 10 लाख कोटींची पहिल्या टप्प्यातील तरतूद करण्याची गरज आहे. 

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

दरम्यान सरकार आमचे नाही शिवसेनेचे आहे अशी आपल्या आवाजात आॅडीओ क्लीप व्हायरल होत आहे या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, त्या आॅडीओ क्लीप बाबात फारसी माहिती घेतलेली नाही. आम्ही माहिती घेत आहे. तो माझा आवाज आहे का याची खात्री करत आहोत. ती खात्री झाल्यानंतर त्यावर बोलेन. राज्य सरकार चांगल काम करत आहे. याबद्दल शंका नाही असे चव्हाण यांनी नमूद केले.

आर्थिक पॅकेजमद्ये बदल करावा. त्यात शेतकरी, भुमीहीन व मजुरांना थेट पैसे देण्याची तरतूद करावी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने 10 लाख कोंटीची तरतूद करावी. त्याबाबतसह सगळ्या स्थितीवरली केंद्र सरकारने दोन महि्यात अंदाजपत्रक सादर करावे. 
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

चार हजार आयटीआयधारकांना राेजगाराची संधी; कृतीची आवश्यकता

मुंबई पुणेकरांना रोजगार हमीची संधी; कोट्यावधीची मजुरी जमा 

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज; वेळापत्रक जाहीर

सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com