सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...

सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...

सातारा : मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवल्याने रोजी रोटीसाठी गेलेले चाकरमनी गावाकडे येऊ लागले आहेत. त्यांना गावकऱ्यांनी प्रेमाने हाक देण्याची गरज निर्माण झाली आहे. गावच्या यात्रा, जत्रा, निवडणुकांच्या काळात हक्काने मुंबईकरांना हाक दिली जाते. आता हाच गावातील मुंबईकर अडचणीत असताना गावकऱ्यांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे. गावकऱ्यांनी त्यांना प्रेमाने जवळ करण्याची गरज असून मुंबईकरांनीही आपली जबाबदारी ओळखून क्वारंटाईन झाले पाहिजे असा सूर व्यक्त होत आहे.


सातारा जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांना कोरोनाने वेढले आहे. ही परिस्थिती परगावाहून येणाऱ्यांमुळेच घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मात्र परगावाहून आलेले आपलेच आहेत. त्यांचा आपण तिरस्कार न करता आपुलकीने वागले पाहिजे असाही सूर नागरीकांसह गावपातळीवरील पुढाऱ्यांमध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील गाव पुढाऱ्यांची भुमिका ई- सकाळने जाणून घेतली.

तारळे गावच्या सरपंच मीना परदेशी म्हणाल्या पुणे मुंबईकर आपलेच आहेत. कामानिमित्त त्यांना गाव सोडावा लागला. त्यांनी यावे मात्र क्वारंटईनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून राहायला पाहिजे. स्वतः सोबत कुटुंब व गावाचे आरोग्य अबाधित राखणे महत्वाचे आहे. बिजवडी (ता.माण) गावचे सरपंच आप्पासो अडागळे म्हणाले मुंबई, पुणेसारख्या शहरात कामानिमित्त गेलेले लोक आपलेच आहेत.आजपर्यंत त्यांच्यामुळे गावच्या विकासात भरच पडली आहे. त्यांचे गावात कायमच स्वागत आहे. मात्र आताची वेळ थोडी वेगळी आहे. कोरोनाच्या भीतीने सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झालय. त्यात मुंबई ,पुणे शहरात या रोगाचा फैलाव जास्त झालाय. अन आता त्याच शहरातील आपली लोक गावाकडे येत आहेत. आपल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होवू नये याची काळजी घेत त्यांनी होम क्वारंटाईन होऊन घरातून बाहेर पडू नये. पवारवाडी (ता.फलटण) येथील ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सर्वांनी मन कठोर ठेऊन वागले पाहिजे असे नमूद केले. ते म्हणाले मुंबईकरांमुळे कोरोनाची साखळी वाढते आहे हे जरी खरे असले तरी रोजी रोटीसाठी बाहेर गेलेल्या गावाच्या भूमीपूत्रांना गावात प्रवेश देणे गाव कारभाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र या भूमीपूत्रांनी त्यांच्या अन्य नातेवाईकांना बरोबर घेऊन येणे हे गावाच्या दृष्टीने घातक आहे. गावाच्या हिताच्या दृष्टीने ग्रामस्थांनीही कुटुंबातील सदस्याशिवाय अगदी जावईला सुध्दा कुटुंबात प्रवेश देणे गैर आहे. त्यांनी त्यांच्या गावातच राहणे पसंत करावे. शासनाने संबंधितांना पास देताना व्यक्ती ज्या गावची आहे, त्याच गावचा पास देणे गरजेचे आहे. त्याबरोबर त्यांची कोविड 19 चाचणी अचूक होणे गरजेचे आहे. जेणेकरून गाव सुरक्षित राहील. अन्य जिल्हयातील व्यक्तीही सुरक्षित ठिकाण म्हणून येण्याचे पसंत करत आहेत. मात्र गावगाडयापुढे या बाबी सांभाळणे जिकीरीचे होते आहे असे स्पष्ट केले.
 
नागझरीचे (ता. कोरेगाव) सरपंच जितेंद्र भोसले यांनी कोणत्याच गावामध्ये कोरोना नाही आणि मुंबई व पुणे येथे राहणाऱ्यांच्या घरामध्येही कोरोना नाही; परंतु प्रवासामध्ये कोरोनाचे वास्तव्य आहे हे समजून घेतले पाहिजे असे नमूद केले. भोसले म्हणाले त्यामुळे पुणे, मुंबईकरांनी गावाला येण्याचा मोह टाळावा. त्यांनी आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहावे. सध्या प्रत्येक गावात खूप लोक आलेत, त्यामुळे अशा लोकांना विलगिकरण करणे, गाव समितीला अशक्‍य झाले आहे. तरी, ज्यांची शहरात राहण्याची सोयच नाही अशांनाच शासनाने गावाकडे प्रवास करण्याची परवानगी द्यावी. सरसकट सर्वांना परवानगी देण्यात येऊ नये, तरच कोरोनाचा प्रसार थांबेल. मूंबईकर हा गावाच्या,घराच्या अर्थव्यवस्थेचा आणि सामाजिक जडणघडणीतील मुख्य पाया आहेत. त्यामुळे त्यांना गावामध्ये प्रवेश नाकारून चालणार नाही. गावकाऱ्यांसह मुंबईकरांनी पण कोरोनाच्या लढाईत नेहमीप्रमाणे नियमांचे पालन करून साथ दिल्यास या संकटातून लवकरच बाहेर पडू याची खात्री असल्याचे गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथील सरपंच अश्विनी अंगराज कट्टे यांनी आपली भावना व्यक्त केली.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गावकरी स्वागताला तयार आहेत पुणे, मुंबई वरून येणाऱ्यांनो तुम्हीही जरा मन मोठे करा असे मत बुधचे सरपंच अभय राजे घाटगे यांचे आहे. ते म्हणतात फक्त 14 दिवसांचा प्रश्न आहे. गाव सुरक्षित राहीले तर आपण सगळेच सुरक्षित राहू ही भावना सर्वांचीच असली पाहिजे. अन्यथा एका छोट्याशा चुकीमुळे संपुर्ण गावाची स्वॅब टेस्ट करायची वेळ येते व गावच्या गावं सिल करावी लागतात, सोबत कोरोनाचे भय देखील वाढते. गावाकडे लहान, म्हातारी माणसे देखील जास्त आहेत. त्यामुळे गावाने केलेल्या व्यवस्थेत क्वॉरंटाईन होणे आवश्‍यक आहे. गावक-यांनी मन मोठे केले आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या भावनांचा आदर करा. गावात येणा-या भुमिपुत्रांना त्यांच्या घरात जाण्याचा संविधानिक अधिकार आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही. मात्र गावाच्या भल्यासाठी व पुढचा अनर्थ टाळण्यासाठी पुणे, मुंबईकरांनी आणि अन्यत्र ठिकाणाहून आलेल्यांनी मोठे मन करून गावचे सरपंच, आपत्ती व्यवस्थापन समिती, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व इतर शासकीय अधिकाऱ्यांना व गावक-यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. क्वॉरंटाईन भाग सोडुन बाहेर पडु नये. स्वत:ची व आपल्या माणसांची काळजी घ्या.

ब्रेकिंग : सुखावलेल्या सातारा जिल्ह्यावासियांना काेराेनाचा दणका

मुंबईकर गावात येण्यास सरपंच म्हणुन माझी काही हरकत नाही. परंतु मुंबईकर नागरीक यांनी क्वारंटाईनचे नियम व गावाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत जेणेकरून ग्रामस्थांमध्ये मतभेद होणार नाहीत असे सोमंथळी (ता.फलटण) सरपंच जगुबाई रामचंद्र सोडमिसे यांनी सांगितले. तर किरकसालचे (ता.माण) सरपंच बुबासो काटकर म्हणाले मुंबईसह बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना गावात घेताना ग्रामस्थ व शासनाचे नियम यांचा ताळमेळ घालूनच काम करावे लागत आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्या लोकांना सर्व सोयीची उपलब्धता देणे आणि त्या लोकांनीही इतरांच्या संपर्कात न येण्याची जबाबदारी पाळली तर कोरोनाचा गावात शिरकाव टाळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. पुण्या मुंबईवरून येणाऱ्यांमुळे गावात व त्या कुंटुबात कोरोना संसर्ग पसरण्याची भीती आहे. मात्र ते आपलेच गावकरी आहेत. ही बाब लक्षात घेवून त्यांच्यासाठी गावातच स्वतंत्र विलगीकरण कक्ष उघडणे आवश्‍यक आहे. मात्र त्यामध्ये अनेक आडचणी आहेत. पाडळीत प्राथमिक शाळेत शौचालय व विजेची अडचण आहे. ग्रामपंचायतीचा मार्चमध्ये वसूल नसल्यामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे. शासनाने यासाठी तातडीचा निधी उपलब्द करावा. गावात पुणे मुंबईवरून आलेल्यांची संख्या 46 आहे. आता त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात कडक लॉकडाऊन पाळून तसेच दोन वेळा औषध फवारणी व गटरांवर जंतूनाशक पावडरी फवारून काळजी घेतली होती. तरी मुंबईवरून आलेला एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे. शासनाने याबाबत ठोस पावले उचलावीत असे मत पाडळी, ता. खंडाळा येथील सरपंच पूनम हरिभाऊ माने यांनी व्यक्त केले. गांजे येथील सरपंच लक्ष्मी चंद्रकांत चिकणे म्हणाल्या मुंबईकर गावात घ्यायचा की नाही खूप मोठा प्रश्न परंतु तो आपला एक सदस्य आहे. या अगोदर गावावर कोणतेही संकट कोणतेही अडचण आली की तो धावत यायचा पण आत्ता त्याच्यावर संकट आले आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी साथ दयायला हवी. परंतू मुंबई, पूणेवाले यांनी कोरोना कमिटीच्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. 

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

सातारा : दुकानांसह वाहतूक उद्यापासून खुली; काळजी घेण्याची सूचना

सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी जाहीर आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com