...म्हणून नमाे अ‍ॅपवरही बंदी घाला : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

चीनकडून सायबर हल्ला हाेण्याच्या भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या त्यांच्या अ‍ॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 अ च्या अंतर्गत घेतला आहे.

सातारा : केंद्र सरकारने साेमवारी (ता.30) तब्बल 59 चायनीज माेबाईल अॅपवर बंदी घातली आहे. माेदी सरकारने हा निर्णय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. हा एक धाडसी आणि महत्वपुर्ण मानला जात आहे. दरम्यान काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनी अॅपवरील बंदीचे स्वागत करुन नमो अ‍ॅपवरही बंदी घालावी अशी मागणी केली आहे. 

याबाबत आमदार चव्हाण यांनी ट्विट केले असून 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. नमाे अॅप देखील वापरकर्त्यांची 22 प्रकाराची माहिती (डाटा) परदेशातील कंपन्यांना पाठविते असा आराेपही केला आहे.  

ते म्हणतात ज्या प्रकारे माेदी सरकारने 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. त्याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा देशा (भारत) बाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमाे अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे. 

चीनकडून सायबर हल्ला हाेण्याच्या भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या त्यांच्या अ‍ॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 अ च्या अंतर्गत घेतला आहे. या कंपन्या या अॅप माध्यमातून कोट्यवधी फोन धारकांची माहिती चीनला पाठवित होत्या असं आढळून आलं आहे. या माहितीचा उपयोग या कंपन्या व्यावसायिक कामांसाठी करत असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर फोन वापरणाऱ्याची सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता होती.
 

भारताचा चीनला दणका; टिकटॉकसह 59 चिनी ऍप्सवर बंदी, वाचा यादी!

भारताचा चीनला मोठा दणका, ५९ चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर भारतात बंदी...

चिनी अ‍ॅपवरील बंदीचा काय होणार परिणाम? जाणून घ्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Congress Leader Prithviraj Chavans Demands To Ban Namo App