राष्ट्रहिताच्या नजरेतून : तुमच्या पंतप्रधानांना नाही म्हणा

पंजाबमधील भटिंडा ते फिरोजपूर दरम्यान महामार्गावर पंतप्रधान मोदींचा ताफा २० मिनिटे उड्डाण पुलावर अडकून पडला.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal

फिरोजपूरप्रकरणी भारतीय हवाई दलाने खऱ्या अर्थाने योग्य पाऊल टाकले. कोणताही संभ्रम न ठेवता देशाच्या प्रमुखास खराब हवामानात उड्डाण करता येणार नाही, असे सांगितले. तुमच्या पंतप्रधानांना नाही म्हणायला किती नैतिक धैर्य लागते, ते यातून दिसून येते आणि हीच गोष्ट तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरते.

- शेखर गुप्ता

PM Narendra Modi
पुणे : अल्पयवीन मुलीची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

पंजाबमधील भटिंडा ते फिरोजपूर दरम्यान महामार्गावर पंतप्रधान मोदींचा ( Prime Minister Narendra Modi)ताफा २० मिनिटे उड्डाण पुलावर अडकून पडला. तो नेमका कशामुळे याबाबत प्रत्येकाने आपली राजकीय भूमिका डोक्यात ठेवून अर्थ लावलेला आहे. फिरोजपूरमधील सभेला गर्दी कमी असल्यापासून ते त्यांच्या हत्येची योजना होती. येथपर्यंत विविध अंदाज बांधून त्याअनुषंगाने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत आणि त्याला जोडून विविध चित्रे, व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. माझ्याकडे असलेली माहिती आणि मी लावलेल्या तथ्यानुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे झालेले हे अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि पंतप्रधानांसाठी आवश्यक असलेला सुरक्षा प्रोटोकॉलही मोडला गेला आहे. पंतप्रधानांचे वाहन उड्डाणपुलावर अडकून पडणे ही चूक नक्कीच डोळेझाक करण्यासारखी गोष्ट नाही. जरी ‘एसपीजी’च्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या गाडीला कव्हर केलेले असले तरी त्या ठिकाणी ते पुरसे नव्हते. यातील आणखी एक मुद्दा असा की, पंतप्रधान रस्ता मार्गे येणार हे समजल्यानंतर महामार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवतानाच आवश्यक अडथळे हटविलेले नव्हते. हे काम राज्य पोलिसांकडे असते. पंतप्रधान या मार्गावरून जाणार आहेत हे पंजाब पोलिसांना माहिती नव्हते का? रस्त्यावर दोन्ही बाजूंना ठरावीक अंतरावर पोलिसांचा बंदोबस्त का ठेवला नव्हता? याचाच अर्थ त्यांनी दुर्लक्ष केले असाही होतो. पंजाबच्या पोलिसांचा लौकिक जाँबाज असा असताना अशी चूक घडणे खचितच योग्य नव्हे.

PM Narendra Modi
सातारा : मांढरदेव यात्रा रद्द, यात्रेनिमित्त जमावबंदी लागू

पहिली गोष्ट अशी की, राज्यातील काँग्रेस (Congress)सरकार जाणूनबुजून पंतप्रधानांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत होते. दुसरे म्हणजे पंतप्रधान ज्या सभेला जाणार होते त्या सभेला खूपच कमी लोकांची उपस्थिती होती, त्यामुळे पंतप्रधानांना तेथे जाणे अयोग्य वाटले आणि त्यांनी सुरक्षेचे नाटक केले. वस्तुस्थितीच्या आधारे हा राष्ट्रीय पेच होता, असे आपण म्हणू शकतो. खरेतर देशाने राजकीय हत्या अनुभवल्या आहेत. त्यामुळे अशा बाबींकडे किरकोळीत पाहू नये. त्या पाठीमागील षडयंत्र शोधण्यात वेळ वाया न घालविता याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या तोडीस तोड स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना झाली. राजीव गांधींच्या काळात या ग्रुपचा दर्जा अधिक अव्वल बनला. तत्कालीन व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर सरकारने राजीव यांना एसपीजी नाकारण्यात चूक केली. हे जरी खरे असले तरी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून कमरेला बाँबपट्टा बांधून राजीव यांच्यापर्यंत पोचलेल्या तरुणीपासून एसपीजीने वाचविले असतेच, हा समज किती सुरक्षित आहे हे पाहायला हवे.

PM Narendra Modi
पुणे : अल्पयवीन मुलीची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

श्रीपेरंबपुदूरमधील घटनेच्या एक दिवस आधी ‘इंडिया टुडे’चे (India Today)संपादक अरुण पुरी आणि मी राजीव यांच्यासोबत वाराणसीमध्ये त्यांच्या प्रचार सभेला उपस्थिती लावली होती. त्यावेळी राजीव यांना गर्दीमध्ये मिसळताना पाहून हैराण झालो होतो. सुरक्षा बाजूला ठेवून लोकांत जास्तीत जास्त मिसळत होते. यातून हेच दिसते की सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या राजकीय व्यक्तींना प्रचारांदरम्यान लोकांमध्ये मिसळण्याची तीव्र इच्छा असते. मात्र अशावेळी केवळ भारावून न जाता ‘एसपीजी’ जे सांगतात ते एेकणे आवश्यक असते, हे ध्यानात ठेवायला हवे.यापलीकडे जाऊन एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे.हत्येच्या नावाखाली राजकीय फायदा उठविण्याचाही प्रयत्न केला जातो, हे इतिहासात डोकावताना दिसून येते. असे म्हणतात. १५ मार्च १९७७ रोजी, मतदानाच्या एक दिवस आधी काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने अमेठीजवळ संजय गांधींच्या वाहनावर कोणीतरी तीन राऊंड फायर केले होते आणि तसे करणारा कोणी संशयितही सापडला नाही आणि त्याबाबत कोणी तक्रारही केली नाही. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. फिरोजपूरच्या घटनेकडे पाहताना सर्व बाबींचा विचार करायला हवा. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेत तातडीने सुधारणा करायला हवी.

PM Narendra Modi
सोलापूर : अनगर- अंजनगाव रस्त्यावर अपघात पिता-पुत्राचा मृत्यु

इतिहास विसरता उपयोगी नाही.

महात्मा गांधी यांची हत्या स्वतंत्र भारतातील पहिली मोठी घटना होती. त्यानंतर १९६५ च्या प्रारंभी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरॉन यांची ग्रँड ट्रंक रोडवर हत्या झाली. १९९५ मध्ये बिअतसिंग यांची हत्या झाली. बिहारमध्ये १९७५ मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा यांच्यावर समस्तीपूर येथे बॉम्बफेक (Bombing) झाली. १९८४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यापूर्वी राजीव गांधी यांच्यावर तीन वेळा हल्ले झाले होते. १४ मे १९८५ मध्ये वॉशिंग्टन येथे, जून १९८६ मध्ये लिसेस्टर येथे तर त्याच वर्षी राजघाटावरही राजीव गांधी आले असता, त्यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नातील एकास ताब्यात घेतले होते. तर तिसरा हल्ला राजीव गांधी कोलंबोमध्ये गार्ड ऑफ ऑनरची पाहणी करत असताना, परेडिंग तुकडीचे सदस्य, नौदल रेटिंग विजेमुनी विजिथा रोहाना डिसिल्वा यांनी त्यांच्यावर रायफलने हल्ला केला होता.

(अनुवाद : प्रसाद इनामदार)

हवाईदलाचा ठाम नकार

सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींना लोकांमध्ये मिळून-मिसळून राहण्याची खूप इच्छा असते..पण सुरक्षेच्या कारणावरून त्यांना सुरक्षा यंत्रणांचे एकावे लागते. अगदी हीच बाब डोळ्यासमोर ठेवून भारतीय हवाई दलाने पंतप्रधान मोदींना खराब हवामानामध्ये हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जाऊ नये, असे सांगितले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com