SBI चा डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न; घेतला हा निर्णय| Digital Banking | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Recuitment

SBI चा डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न; घेतला हा निर्णय

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना डिजिटल बँकिंगचा (Digital banking) अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. एसबीआयने डिजिटल व्यवहारांवर शून्य शुल्कासह तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा (IMPS) व्यवहारांची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखापर्यंत वाढवली (Increased transaction limits) आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबरमध्ये तात्काळ मोबाईल पेमेंट सेवेबाबत मोठी घोषणा केली होती. याअंतर्गत आता ग्राहक एका दिवसात पाच लाखांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा दोन लाख रुपये होती.

बँकेने योनोसह इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगद्वारे पाच लाखांपर्यंतच्या तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा (Immediate mobile payment service) व्यवहारांवर कोणतेही सेवा शुल्क आकारलेले नाही. तर शाखा चॅनेलच्या बाबतीत विद्यमान स्लॅबमधील बँकेच्या शाखेत जाऊन केलेल्या तात्काळ मोबाईल पेमेंट सेवेसाठी सेवा शुल्कामध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन ते पाच लाखांसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे. दोन ते पाच लाखांच्या दरम्यान केलेल्या (Increased transaction limits) तात्काळ मोबाईल पेमेंट सेवेद्वारे पैसे पाठवण्याचे शुल्क २० रुपये अधिक जीएसटी असेल. तात्काळ मोबाईल पेमेंट सेवेवरील सेवा शुल्क एनईएफटी/आरटीजीएस व्यवहारांवरील सेवा शुल्काच्या बरोबरीचे आहे.

हेही वाचा: सहा दिवसांची झुंज संपली; जखमी मुलीचा नागपुरात मृत्यू

एक हाजारापर्यंच्या व्यवहारासाठी तात्काळ मोबाईल पेमेंट सेवाअंतर्गत (Immediate mobile payment service) कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. १००१ ते १०,००० हजारांपर्यंतच्या व्यवहारासाठी दोन रुपये अधिक जीएसटी आकारली जाईल. १०,००१ ते एक लाखापर्यंतच्या व्यवहारांवर ४ रुपये अधिक जीएसटी लागू होईल. एक लाखापेक्षा जास्त रकमेवर आणि दोन लाखांपर्यंत १२ रुपये अधिक जीएसटी आकारली जाईल. हे शुल्क फक्त बँकेच्या शाखेतून केलेल्या व्यवहारांवर लागू आहे.

तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा म्हणजे काय?

तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा (Immediate mobile payment service) ही बँकांद्वारे दिलेली लोकप्रिय पेमेंट सेवा आहे. जी रिअल टाइम दुसऱ्या बॅंकेत पैसे पाठवण्याची परवानगी देते. ही सेवा रविवार आणि सुट्ट्यांसह आठवडाभर सुरू राहते. तात्काळ मोबाईल पेमेंट सेवेद्वारे कोणत्याही खातेदाराला कुठेही, कधीही पैसे पाठवू शकता. पैसे पाठवण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही.

हेही वाचा: आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

पैसे पाठवण्याचे तीन मार्ग

भारतात ऑनलाइन बँकिंगद्वारे पैसे कुठेही, कधीही पाठवले जाऊ शकतात. परंतु, पैसे पाठवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. ऑनलाइन बँकिंगमधून पैसे हस्तांतरित करण्याचे तीन मार्ग आहेत. यामध्ये आईएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS) यांचा समावेश आहे. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे हाताळले जाते. यामध्ये निधी हस्तांतरित करून पैसे त्वरित हस्तांतरित केले जातात. तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा आठवडाभर चोवीस तास सुरू असते. तर एनईएफटी आणि आरटीजीएस ही सुविधा देत नाहीत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SBI
loading image
go to top