
Atal Aahar Yojana: नवी दिल्ली : ज्या खवय्यांना साउथ इंडियन डिशेस आवडतात त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण जेव्हा तुम्ही दिल्लीला भेट द्याल आणि सांबर-वडा किंवा इडली खाण्याची इच्छा असेल, तर दक्षिण दिल्ली नगर निगम (एमसीडी)च्या अटल डाएट स्टॉलपेक्षा चांगली जागा कुठंही भेटणार नाही. साउथ एमसीडीने अटल थाळी योजना सुरू केली असून त्यात आता नाश्ताचे पदार्थही मिळणार आहेत.
अटल थाळी योजनेंतर्गत मिळणाऱ्या नाश्त्यामध्ये आता साउथ इंडियन पदार्थांना स्थान देण्यात आलं आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत नाश्ता मिळेल. पाच पुरी, पराठे, भाज्या आणि लोणचे, तर आठवड्यातून एक दिवस वडा-सांबर, इडलीचा समावेश असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता फक्त १० रुपयांना मिळणार आहे. तसेच थाळीमध्ये काही नवीन खाद्य पदार्थांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.
४० ठिकाणी 'अटल थाळी'
दक्षिण एमसीडीचे नेते सदान नरेंद्र चावला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल थाळीची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. यापूर्वी ही थाळी दक्षिण एमसीडी क्षेत्रात केवळ ५ ठिकाणी उपलब्ध होती, पण आता ती ४० ठिकाणी सापडेल. कोरोना महामारीमुळे अटल थाळी सुरू करण्यास उशीर झाला. २०१९-२० या आर्थिक वर्षातच अटल थाळी सुरू करण्यात येणार होती.
अटल थाळीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खाद्यपदार्थ असतील. १५ रुपयांच्या डिशमध्ये दोन चपाती किंवा दोन पराठे, भाजी, रायता, भात मिळणार आहे. गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही यासाठी एमसीडीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी दर १५ दिवसांनी अन्नाची गुणवत्ता तपासणार आहेत.
अटल थाळी योजनेंतर्गत जेवण दुपारी १२ ते दुपारी ३ या वेळेत सर्व स्टॉल्सवर उपलब्ध असणार आहे. नाश्त्यासाठी १० रुपये तर जेवणासाठी १५ रुपये आकारले जाणार आहेत.
रोजगाराच्या संधी
सदान यांच्या म्हणण्यानुसार, अटल आहार योजनेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना स्वस्तात आणि दर्जेदार अन्न मिळेल. तसेच काही लोकांना रोजगारही मिळेल. अटल आहार योजनेंतर्गत स्टॉल ऑपरेट करणारी व्यक्ती उर्वरित वेळेत बेकरीच्या वस्तूही विकू शकेल.
शिवभोजन थाळी
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर गरीब आणि गरजूंसाठी रास्त दरात प्रायोगिक तत्वावर आहार योजना सुरू केली. महाविकास आघाडीची ही आहार योजना शिवभोजन थाळी म्हणून ओळखली जाते. या अंतर्गत १० रुपयात पोटभर जेवण देण्यात येते.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.