यूपीमध्ये भाजपला गळती; सपा नेत्याने खिजवण्यासाठी पक्षाला पाठवलं कुलूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

यूपीमध्ये भाजपला गळती; सपा नेत्याने खिजवण्यासाठी पक्षाला पाठवलं कुलूप

लखनऊ: उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वीच (assembly election) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एकामागोमाग एक असे धक्के बसत आहेत. गेल्या एक महिन्यापासून भाजपच्या अनेक आमदारांनी भाजपला रामराम ठोकत समाजवादी पक्षाला आपलंसं केलं आहे. आजच यूपी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडला (3 more MLAs left the party) आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यानं केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा: गोव्यात महाविकास आघाडी-२ साठी प्रयत्न; संजय राऊतांचे संकेत

आयपी सिंग या नेत्याने ट्विट करत म्हटलंय की, ओमप्रकाश राजभरजी, जयंत चौधरीजी, राजमाता कृष्णा पटेल जी, संजय चौहानजी आणि आता स्वामीप्रसाद मौर्यजी समाजवादी पक्षासोबत आहेत. मी भाजपच्या मुख्यालयाला एक कुलूप भेट म्हणून पाठवलं आहे. 10 मार्चनंतर मुख्यालयाला लावून घरी जा. लाट नाही तर आता समाजवादी पक्षाचं वादळ आलंय, असं ट्विट त्यांनी केलंय.

कानपूर देहाट आणि बांदा येथील आमदारांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. शाहजहांपूरचे तिल्हारचे आमदार रोशनलाल वर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत सायकलवर स्वार झाले आहेत. गेल्या महिन्यापासून म्हणजे 11 डिसेंबर ते 11 जानेवारीपर्यंत भाजपच्या मोठ्या 17 नेत्यांना पक्ष सोडून समाजवादी पक्षाची धुरा पत्करली आहे. यामध्ये योगी सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री यांच्यासह 11 आमदारांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: भारतात अशा पद्धतीने कमावलेल्या पैशांवर द्यावा लागत नाही Tax

विधानसभा निवडणुकीपूर्वी (assembly election) भाजपमध्ये (BJP) सुरू झालेला राजीनाम्याचा फेरा वाढत चालला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी आमदारांची नावे चर्चेत आली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य आणि नीरज मौर्य हे पक्ष सोडू शकतात. मात्र, अद्याप त्यांनी कहीही सांगितलेले नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top