गोव्यात महाविकास आघाडी-२ साठी प्रयत्न; संजय राऊतांचे संकेत

शरद पवारांनी गोव्यात काँग्रेससोबत आघाडीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे.
sanjay raut
sanjay rautsanjay raut

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता महाराष्ट्राप्रमाणं गोव्यातही महाविकास आघाडी -२ साठी (Maha Vikas Aaghadi) हालचाली सुरु झाल्या आहेत. म्हणजेच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संकेत दिले आहेत. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पत्रकार परिषदेत गोव्यात काँग्रेससोबत आघाडीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. (Efforts underway for Mahavikas Aghadi 2 in Goa Hints from Sanjay Raut)

sanjay raut
पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार

राऊत म्हणाले, "गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडलं तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आमची चर्चा सुरू आहे. आताच आमची सी. वेणूगोपाल यांच्याशी चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात परिवर्तन घडवू शकतो. शिवसेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे, असं आम्ही त्यांना सांगितलं. दरम्यान, गोव्यात तृणमूलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा करणार नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी अशी आमची इच्छा आहे पण जर काँग्रेसची तशी इच्छा नसेल तर आम्ही स्वबळावर लढू, असा इशाराही यावेळी राऊत यांनी दिला.

sanjay raut
"सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही" - स्मृती इराणी

गोव्यात भाजपचा मंत्री आणि आमदाराने पक्ष सोडला. म्हणजेच गोव्यात भाजप अभेद्य नाही. युपीत भाजपच्या अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो, त्यामुळं भाजपन सावध राहावं, असा खोचक टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला. काल गोव्यासंदर्भात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली, यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचं जहाज हेलकाऊ शकतं - राऊत

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी लाटांचे तडाखे बसायला लागले आहेत, सध्या या लाटा मंद आहेत. पण त्या केव्हाही उसळू शकतात आणि भाजपचं जहाज हेलकावू शकतं, असा टोलाही यावेळी राऊत यांनी भाजपला लगावला. शिवसेना युपीत ५० जागा लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. मी उद्या दिल्लीत व परवा युपीत आहे. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका, गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे, असंही राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com