लशींचा तुटवडा संपणार? सीरमने दिली गुड न्यूज

covishield
covishield
Summary

देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून लशीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यांनी केंद्राकडे लशीचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली- देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून लशीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यांनी केंद्राकडे लशीचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे. पण, लस निर्मिती कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमी लशींमुळे राज्यांना लस पुरवठा करताना केंद्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सरकारला किंबहूना लोकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जून महिन्यात 9 ते 10 कोटी लस दिले जातील, अशी माहिती सीरमने केंद्र सरकारला दिली आहे. राज्यांकडून कोरोना लशींची मागणी वाढत असताना सीरमच्या माहितीने दिलासा मिळणार आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Serum Institute to Centre Will be able to manufacture supply 10 cr Covishield doses in June)

सीरमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, लशींचा पुरवठा करण्यासाठी कंपनीचे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. आम्हाला सांगताना आनंद होतोय की, मे महिन्यात आमची लस उत्पादन क्षमता 6.5 कोटी होती. जून महिन्यात आम्ही 9 ते 10 कोटी कोविशिल्ड लशींचे उत्पादन आणि वितरण करु शकणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटमधील अधिकारी प्रकाश कुमार सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

covishield
बॉम्बची अफवाच! मंत्रालयात संशयास्पद वस्तू आढळली नाही

अमित शहा यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत आणि पाठिंब्यासाठी सिंह यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, शहा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण जात आहोत. देशातील प्रत्येक नागरिकाला आपण लस पुरवणार आहोत. सीरम आपल्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या नेतृत्वाखाली सरकारसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही अविरत काम करत आहोत.

covishield
वातावरणात बदल, मॉन्सून ३ जूनला केरळात - IMD

दरम्यान, भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडयाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस वापरली जात आहे. शिवाय रशियाच्या स्पुटनिक V लशीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. लस निर्मिती कंपन्या आपली उत्पादन क्षमता दिवसेंदिवस वाढवत आहेत. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीच लशींचा तुटवडा दूर होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com