संसदेचे अधिवेशन २९ जानेवारी पासून

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 15 January 2021

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोविड प्रोटोकॉलचे कसोशीने पालन केले जाणार आहे. कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्यासह लोकप्रतिनिधींना आणि वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनाही कोरोना चाचणी बंधनकारक असेल.

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन बोलावण्याचे औपचारिक आदेश दिले आहेत. अधिवेशन २९ जानेवारीला सुरू होईल. तर ८ एप्रिलला अधिवेशनाचा समारोप होईल. राष्ट्रपती अभिभाषणाने सुरवात होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल पटलावर मांडला जाईल. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोविड प्रोटोकॉलचे कसोशीने पालन केले जाणार आहे. कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्यासह लोकप्रतिनिधींना आणि वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनाही कोरोना चाचणी बंधनकारक असेल.  संसंदेच्या अधिवेशनाच्या प्रस्तावित वेळापत्रकाची शिफारस दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार विषयक केली होती. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिवेशन बोलावले आहे. २९ जानेवारीला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनास प्रारंभ होईल. याच दिवशी आर्थिक पाहणी अहवालही मांडला जाईल. तर एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत मांडतील. पहिला टप्पा १५ फेब्रुवारीला संपेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा ८ मार्चला सुरू होऊन ८ एप्रिलला संपेल.

हे वाचा - सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा NPA वाढण्याची शक्यता; RBIने प्रसिद्ध केला रिपोर्ट

कामकाजाच्या वेळा
संसंदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे. तसेच लोकसभेचे कामकाज सायंकाळी चारपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार अाहे. 

हे वाचा - Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Session of Parliament from January 29