Crime News : सेक्स चॅटमुळे पत्नीला दिली भयानक शिक्षा, पतीने दुसऱ्या राज्यात जाऊन...

Crime News
Crime News

Crime News :  प्रेमविवाहानंतर पती-पत्नी दोघेही सुखात राहत होते. पण एके दिवशी पतीने पत्नीचा मोबाईल चेक केला आणि त्यानंतर दोघांमधील अंतर वाढतच गेले. नवऱ्याच्या मनात संशय इतका भरला की तो सतत पत्नीला मारण्याचा कट रचत होता.

ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. पत्नीची हत्या करण्यासाठी पती बिहार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गेला. खुनी पती त्याच्या मोहिमेत यशस्वी होऊ शकला नाही. अखेर तो पती उत्तर प्रदेशातून उत्तराखंडमध्ये गेला. याठीकाणी त्याने पत्नीची हत्या केली.बिचाई येथे दोन महिन्यांपूर्वी महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी खुलासा केला तर या महिलेचा खून करणारा दुसरा कोणी नसून तिचा नवरा असल्याचे निष्पन्न झाले.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपी पतीने पत्नीची हत्या केली होती. पोलिसांनी आरोपी पतीला तुरुंगात पाठवले आहे. पोलीस अधिक्षक देवेंद्र पिंचा यांनी सांगितले की, रिझवानचा मुलगा सईद खान याचा त्याच्याच गावातील हशमत खान हिच्यासोबत २०२० मध्ये प्रेमविवाह झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर रिझवान पत्नी मुस्कानला बिहार, मुंबई आणि पंजाब येथे घेऊन गेला जेथे तो भाड्याने राहत होता. दरम्यान, रिझवानला पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

पोलिस चौकशीत रिझवानने सांगितले की, त्याने अनेक वेळा पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. शेवटी तो पत्नीला घेऊन २६ जानेवारीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने उत्तराखंड येथील टनकपूरला आला. रात्री येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर २७ जानेवारीला सकाळी पत्नीसह ते रेल्वे स्थानकाकडे निघाले. (Crime News)

Crime News
Congress on Sharad Pawar : शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट! दिल्लीत ठरलं मात्र मुंबईत....

पत्नीला घेऊन रिझवान रेल्वे रुळावरून चालत बिचाईजवळ पोहोचला. जिथे त्याने कलमठ येथे रेल्वे रुळावरील पुलाखाली पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून केला. २८ जानेवारी रोजी स्थानिक लोकांनी मृतदेह रेल्वे रुळावर पडलेला पाहिला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून तपास सुरू केला.

आरोपी रिझवानने यापूर्वीही पत्नीच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता. रिझवानला मुंबईतील समुद्रकिनारी नेऊन ठार मारायचे होते, मात्र तेथील गर्दीमुळे प्लॅन रखडल्याचे त्याने सांगितले.

Crime News
Farmers News : खराब झालेल्या गव्हाचीही खरेदी करणार; 'या' सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com