

Sharad Pawar, Supriya Sule Meet PM Narendra Modi
Esakal
नीट पेपर फुटी प्रकरण तापलं असून दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. तर काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनीही नीट पेपर फुटी प्रकरणावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा करावी अशी मागणी केलीय. दरम्यना, या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. दिल्लीतील आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली होती, त्यानंतर आज पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. Sharad Pawar Meets PM Modi in Delhi With Supriya Sule