"मोदी सत्तेत आल्यापासून मणिपूरचा विकास, काँग्रेसचं नव्हतं लक्ष"; अविश्वास प्रस्तावावर श्रीकांत शिंदे बरसले

Shiv Sena MP Shrikant Shinde
Shiv Sena MP Shrikant Shinde

No-Confidence Motion: मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, विरोधकांना यूपीएची लाज वाटते कारण त्यांना फक्त घोटाळे आठवतात. म्हणून त्यांनी इंडिया हे आघाडीचं नाव ठेवलं. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला होता. इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, अशी इंडियाती स्थिती आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सुची A टू Z वाचली तरी कमी पडेल.

मणिपूरच्या मुद्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, मणिपूरमध्ये जे होत आहे. तो चिंतेचा विषय आहे. यावर गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील सर्व जनता एनडीए सोबत आहे. काँग्रेसच्या काळात मणिपूरकडे लक्ष दिले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मणिपूरचा विकास सुरू झाला.

Shiv Sena MP Shrikant Shinde
Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणी हिंदू गटाला झटका! 'ही' याचिका हायकोर्टानं फेटाळली

काँग्रेसच्या सत्ताकाळात मुंबई, पुणे, मालेगाव, हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. तेव्हा कोण गप्प होते, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला केला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर देखील हल्लाबोल केला. मविआ सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात केंद्राचे अनेक प्रकल्प रोखले गेले होते. कोरोना काळात तेव्हाचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते. अडीच वर्षाच अडीच दिवस मंत्रालयात जाऊन उद्धव ठाकरेंनी नवीन रेकॉर्ड केला, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

खुर्चीसाठी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.

Shiv Sena MP Shrikant Shinde
No-Confidence Motion : राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं! लोकसभेत 'नॅचरली करप्ट पार्टी' असा पुनरुल्लेख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com