esakal | कोरोनाशी लढा आणि काँग्रेसची 'सफाई', एका दगडात शिवराज सिंहांनी मारले दोन पक्षी
sakal

बोलून बातमी शोधा

ShivrajSingh Chauhan

त्यांचं हे एका दगडात दोन पक्षी मारणारं ट्विट सध्या चांगलंच चर्चेत असून ते व्हायरल होत आहे. 

कोरोनाशी लढा आणि काँग्रेसची 'सफाई', एका दगडात शिवराज सिंहांनी मारले दोन पक्षी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहार  विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन सुव्यवस्थितपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान असणार आहे. 

हेही वाचा - खुशखबर :जॉनसन लस देतीय 'कोरोना'विरोधात सकारात्मक परिणाम

मध्य प्रदेशातील पोटनिवडणूकांची संभाव्य तारिख 29 सप्टेंबरला घोषित होण्याची शक्यता आहे. परंतु, यादरम्यानच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं एक मजेशीर असं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. या मजेशीर ट्विट द्वारे शिवराज सिंह यांनी काँग्रेसला हरवण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. 

शिवराज सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझ्या प्रिय मित्रांनो, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटकसहित इतर अनेक राज्यात निवडणूका होणार आहेत. आपल्याला कोरोना काळात निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांवर पूर्णत: लक्ष द्यायचे आहे. त्याचं पालन करायचं आहे. 'हात' पूर्णपणे सॅनिटाईझ करून 'साफ' करायचे आहेत. 

हेही वाचा - Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

या ट्विटच्या माध्यमातून शिवराज सिंह यांनी एकाबाजूला लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी घ्यायच्या खबरदारीबाबत देखील आवाहन केले आहे तसेच त्यांनी काँग्रेसवरही अप्रत्यक्षपणे निशाना साधला आहे. त्यांचं हे एका दगडात दोन पक्षी मारणारं ट्विट सध्या चांगलंच चर्चेत असून ते व्हायरल होत आहे. 

loading image