मोठी अपडेट! वेगवेगळ्या हत्यारांनं श्रद्धाच्या शरिराचे केले तुकडे; अफताबचा खुलासा : Shradhha murder Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shradhha murder Case: मोठी अपडेट! वेगवेगळ्या हत्यारांनं श्रद्धाच्या शरिराचे केले तुकडे; अफताबचा खुलासा

Shradhha murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, या प्रकरणातील आरोपी अफताब यानं वेगवेगळ्या हत्यारांनी श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले होते. खुद्द अफताबनंचं पॉलिग्राफी टेस्ट दरम्यान पोलिसांनी याची माहिती दिली. (Shradhha murder accused Aftab has multiple weapons were used to dismember Shraddha body)

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी अफताबनं पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाच्या शरिराचे तुकडे करण्यासाठी त्यानं वेगवेगळ्या हत्यारांचा वापर केला. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ५ मोठे चाकू जप्त केले होते. ही हत्यारं फॉरेन्सिक टीमकडं तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: शिवाजी महाराजांविषयी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर शिंदेंनी बोलणं टाळलं; म्हणाले...

दरम्यान, अफताबची आज पॉलिग्राफी टेस्ट पार पडली, उद्या देखील ही टेस्ट होणार आहे. दरम्यान, आजच्या चाचणीत त्यानं काही महत्वाचे खुलासे केले आहेत. सुप्रीम कोर्टानं अफताबच्या पॉलिग्राफी आणि नार्को टेस्टला परवानगी दिली आहे. त्यानुसार त्याच्या या चाचण्या केल्या जात आहेत. पॉलिग्राफी टेस्टनंतर अफताबची नार्को टेस्ट होणार आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्यक्तीकडून खरी माहिती बाहेर काढण्यासाठी नार्को चाचणीचा वापर केला जातो. त्यामुळं नार्को टेस्ट आणि उपलब्ध पुरावे यांची सांगड लागते का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Crime NewsDesh news