दिल्ली पोलिसांवर तलवारीने हल्ला करणाऱ्यासह 44 जणांना अटक

attack.
attack.

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी 44 लोकांना ताब्यात घेतले असून यात दिल्ली-हरियाणादरम्यानच्या सिंघू बॉर्डरवर (Singhu Border Clash) शुक्रवारी पोलिस कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. सिंघू बॉर्डर तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी करत असलेल्या आंदोलनाचे केंद्र बनले आहे. दिल्ली पोलिसांना सिंघू बॉर्डरवर शेतकरी आणि स्थानिक लोकांमध्ये झालेल्या संघर्षाला शांत करण्यासाठी शुक्रवारी अश्रूधूर कांड्या आणि लाठीचार्ज करावा लागला होता. युवकांचा हा समुह स्वत:ला स्थानिक रहिवासी सांगत होता आणि आंदोलनकर्त्यांनी जागा रिकामी करावी अशी मागणी करत होता. 

इस्त्रायल दुतावास स्फोट: घटनास्थळी मिळाला संशयित लिफाफा, बॉम्बसंबंधी साहित्य

दिल्ली पोलिस अधिकारी प्रदीप पालीवाल तलवारीच्या हल्ल्यात जखमी झाले होते. काही अन्य पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेते राकेश टिकैत, पवन कुमार, राज किशोर सिंह, तजिंदर सिंह विर्क, जितेंद्र सिंह, त्रिलोचन सिंह, गुरमुख सिंह, हरप्रीत सिंह आणि जगतार सिंह बाजवा यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. 

कृषी कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर सुरु असणाऱ्या धरणे आंदोलनस्थळी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. याचवेळी स्वत:ला स्थानिक म्हणणाऱ्या लोकांनी घटनास्थळी येऊन घोषणाबाजी सुरु केली. शेतकऱ्यांनी याठिकाणाहून हटावं अशी त्यांनी मागणी केली. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधूर कांड्या फोडाव्या लागल्या.

विधान परिषदेत पॉर्न पाहणाऱ्या काँग्रेस आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, भाजपची...

दरम्यान, 26 जानेवारीला शेतकरी आणि पोलिसांमधील झालेल्या संघर्षानंतर संयुक्त किसान मोर्चाने 30 जानेवारीला संपूर्ण देशात सद्भावना दिवस म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलंय की, दिल्लीसह देशभरात जेथे-जेथे कृषी कायद्यांविरोधात निदर्शने करत आहेत, तेथे 30 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करण्यात येईल. संयुक्त किसान मोर्चाने सर्व देशवासियांना एकदिवसीय उपवास करण्याचे आवाहन केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com