शोपियाँ आणि अवंतीपुरा येथे चकमक; २४ तासांत एवढे दहशतवादी....

जावेद मात्झी
Saturday, 20 June 2020

आगीमुळे भूसुरुंगांचा स्फोट 
जम्मू - जम्मू-काश्‍मीरमधील पूँच जिल्ह्यातील सीमा नियंत्रण रेषेवर लागलेल्या आगीमुळे भूसुरुंगांचा स्फोट झाल्याने भडका उडाला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या भकडक्‍यात पाच भूसुरुंगांचे स्फोट झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. आगीचा वणवा सीमा रेषेवर मानकोट सेक्‍टरपर्यंत पसरला होता. अग्निशामक दल आणि भारतीय लष्कराच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात आली. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने हे भूसुरुंग पेरले होते. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

श्रीनगर - भारतीय लष्कराने जम्मू-कश्मीरच्या शोपियाँ आणि अवंतीपुरा परिसरामध्ये मागील २४ तासांत आठ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यातील पाच दहशतवाद्यांना शोपियाँमध्ये, तर तीन दहशतवाद्यांना अवंतीपुरा येथे झालेल्या चकमकीदरम्यान ठार मारण्यात सुरक्षादलाला यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह आणि लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी शुक्रवारी सकाळी आठ दहशतवादी मारले असल्याची माहिती दिली.

इंच इंच लढू; पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही, चीनला इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी सुरू असून, पम्पोरमध्ये गुरुवारी चकमकीमध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. तर इतर दोन दहशतवादी हे मशिदीत जाऊन लपले होते. शुक्रवारी सकाळी जवानांकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) कमांडो मशिदीत घुसले व दोन्ही दहशतवाद्यांचा खातमा केला.

आणखी वाचा - 'तर, आरएसएसच्या लोकांना सीमेवर पाठवा'

दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर शोपियाँ जिल्ह्यातील बंडपावा परिसरात चकमक सुरू असून, आत्तापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे. यातील एका दहशतवाद्याला काल ठार करण्यात आले होते, तर येथे अद्यापही चकमक सुरू असून, या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. संपूर्ण परिसराला सध्या जवानांनी वेढा दिलेला असून, शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

58 वर्षांपासून भारतात राहतोय चिनी सैनिक, दोन देशांमधील संघर्षावर म्हणाला...

एका दहशतवाद्याला अटक 
काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये गुरुवारी सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला अटक केले असून, त्याच्याकडून शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पकडण्यात आलेला दहशतवादी हा कुगामच्या रेदवानीचा इमरान दार आहे. तो नुकताच दहशतवादी संघटनेत भरती झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So many terrorists in shopian and awantipora in 24 hours