
वडिलांच्या अनैतिक संबंधाचा राग; मुलाने खंडणी देत केला खून
वडील संजय मंडल (५२) यांचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलाला लागली. यामुळे चिडलेल्या मुलाने ७० हजारांची खंडणी (ransom) देऊन वडिलांचा खून (Murder) केला. तसेच वडिलांसोबत राहणाऱ्या महिलेला या प्रकरणात गोवण्याचा कट रचला. ही घटना बिहारमधील मुंगेरमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी मुलगा सत्यवीर कुमार ऊर्फ छोटू याला पोलिसंनी अटक केली आहे. (Son killed his father by paying a ransom)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी शामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय मंडल (५२) या इसमाची हत्या करण्यात आली होती. झोपेत असताना हा हल्ला करण्यात आला होता. वडिलांच्या हत्येनंतर मुलाने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून वडिलांसोबत राहणाऱ्या महिलेसह अन्य चार अज्ञात लोकांविरुद्ध संशय व्यक्त केला हेता.
हेही वाचा: राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर सोमवारी निर्णय
मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेला अटक करून कारागृहात पाठवले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली असता सत्य काही वेगळेच निघाले. शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना कळले की, ही हत्या महिलेने केलेली नाही. यामुळे पोलिसांना सखोल तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संजय यांची हत्या मुलांनी केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला असता लहान मुलगा सत्यवीर कुमार ऊर्फ छोटू याने खून केल्याचे पुढे आले, असे एसपी जग्गुनाथ रेड्डी यांनी सांगितले.
बापाने मुलांना घराबाहेर हाकलले
संशयाच्या आधारे सत्यवीर कुमार ऊर्फ छोटू याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सहा वर्षांपूर्वी आईला जाळून मारले होते. त्यानंतर वडिलांनी विवाहित महिलेला घरात ठेवण्यास सुरुवात केली. वडील आणि महिलेने मिळून त्याला आणि त्याच्या भावाला घरातून हाकलून दिले होते. तसेच मालमत्ता विकून आनंदाने राहू लागले होते, असे छोटूने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा: गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
७० हजारांजी खंडणी
११ मे रोजी लग्नासाठी घरी आल्यावर छोटूने वडिलांच्या हत्येचा कट रचला आणि ७० हजारांची खंडणी (ransom) असरगंज येथील तीन गुन्हेगारांना दिली. खंडणी घेतल्यानंतर गुंडांनी संजय यांची हत्या (Murder) केली. त्यानंतर कट रचून महिलेला यात गोवले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केल्यानंतर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
Web Title: Son Killed His Father By Paying A Ransom Murder Crime News Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..