सासू जावयाला म्हणाली, तू असा का पाहतोस...

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

घरात एकटी असताना जावई दारू पिवून आला होता. त्यावेळी त्याची नजर काही वेगळीच होती. जावई वेगळ्याच नजरेने पाहात असल्याची शंकाही आली. तसे त्याला विचारलेही पण, त्याने नको ते केलेच.

हैदराबाद : घरात एकटी असताना जावई दारू पिवून आला होता. त्यावेळी त्याची नजर काही वेगळीच होती. जावई वेगळ्याच नजरेने पाहात असल्याची शंकाही आली. तसे त्याला विचारलेही पण, त्याने नको ते केलेच. जावयाने सासूवर बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे.

तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर युवतीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना पुन्हा बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या जावयाला अटक केली आहे. हैदराबादेतील पंजागट्ट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 48 वर्षीय महिलेने तिच्या जावयाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला एका अपार्टमेंटमध्ये मुलगी आणि जावईसोबत राहते. दारूच्या नशेत आलेल्या जावयाने बलात्कार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटीच होती. घरात एकटीच असताना जावयाने जबरदस्तीने बलात्कार केला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझा तिच्यावर बलात्कार करून झालाय; तुम्ही पण या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son in law raped in hyderabad