

Jantar Mantar Operation: Sonam Wangchuk Shifted
Esakal
गेल्या २१ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केंद्र सरकारकडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने केला आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या प्लॅनिंगची चर्चा होत आहे. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवण्यासाठी शुक्रवारपासूनच तयारी केली जात होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा प्लॅन गुप्त ठेवला होता. Police Planned Early Morning Shift of Sonam Wangchuk