

Sonam Wangchuk Wife statement
esakal
Geetanjali Angmo : पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना कोणतेही तोंडी किंवा शिरामार्गे (IV) औषधोपचार करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची आणि मागील २० दिवसांपासून प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची संमती घ्यावी, अशी विनंती त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी आज (ता.१८) शनिवारी केली.
दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून वांगचुक यांना सकाळी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. सध्या ते शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आपत्कालीन विभागात वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.