IRCTC Ticket booking : आता नुसता तोंडी हुकूम दिला की बुक होणार ट्रेन तिकीट, IRCTCची नवी सेवा

आता नुसता तोंडी हुकून दिला तरी तिकीट बुकींग होणार. कसं ते जाणून घ्या.
IRCTC Ticket booking
IRCTC Ticket bookingesakal

IRCTC Ticket booking : प्रत्यकाने कधीना कधी ट्रेनचा प्रवास हा केलाच असावा. बाहेरगावी शिकायला किंवा नोकरीला असणाऱ्या लोकांना ट्रेनने प्रवास करण्याचा प्रसंग सर्वाधिक येतो. तेव्हा रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळावी म्हणून दूर ठिकाणी राहाणारी मंडळी आधीच तिकीट काढून ठेवातात. मात्र रेल्वेची नवी भन्नाट सेवा तुम्हाला माहितीये काय? आता नुसता तोंडी हुकून दिला तरी तिकीट बुकींग होणार. कसं ते जाणून घ्या.

बदलत्या काळानुसार रेल्वेनेही तंत्रज्ञानाच्या साथीने स्वत चे रुपडे बदलले. हा ट्रेंड चालू ठेवत आयआरटीसी लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त आवाजाच्या मदतीने तिकीट बुक करू शकतात.आयआरसीटीसी सध्या आस्क दिशा नावाच्या एआर प्लॅटफाॅर्मच्या चाचणीतून जात आहे. दिशाला विचारा या व्हाॅईस कमांडच्या मदतीने ग्राहकांना तिकीट बूकिंगची सर्व प्रक्रिया फाॅलो करता येईल.

IRCTC Ticket booking
IRCTC News : रेल्वेचे कानठळ्या बसणारे हॉर्न आता वाजणार नाहीत, जाणून घ्या कसं?

अनेक बदल अपेक्षित

या अनोख्या तिकीट बूकींग प्रक्रियेची पहिली चाचणी प्रक्रिया यशस्वी करण्यात आली. आता यापुढे इतरही बदल अपेक्षित आहेत. प्रत्येकदिवशी आॅनलाईन टिकिटींग क्षमता वाढवण्यासाठी आयआरसीटीसी अशा प्रकारची अनोखी शक्कल लढवत आहे.

आस्क दिशा ही एआय प्रणाली आयआरसीटीसीने पहिल्यांदा आँक्टोबर २०१८ ला दाखल केली होती. यासाठी बंगळूरु स्थित कारोवार प्रायव्हेट लिमिटेडशी करार करण्यात आला होता. सध्या तिकीट बूकिंगसह ग्राहकांना सपोर्ट सर्व्हिस देण्यासाठी ओटीपी आधारित सेवा दिली जाते.

IRCTC Ticket booking
Indian Railway : PNR टाका अन् व्हॉट्सअपवरून मागवा जेवण; वाचा काय आहे IRCTC ची योजना

आस्क दिशाची (Ask Disha) खास वैशिष्ट्ये

प्रवासी आयआरसीटीसीच्या चॅटबॉट आस्क दिशा २.० च्या मदतीने तिकीट बुक करू शकतात. यासाठी ग्राहक टेक्स्ट किंवा व्हॉइस कमांड वापरू शकतात. ग्राहक आस्क दिशा २.० वर त्याचे तिकीट रद्द करू शकतात आणि रद्द केलेल्या तिकिटाची परतावा स्थिती तपासू शकतात. यासोबतच यात पीएनआर स्टेटस देखील तपासता येतो. तुम्ही ग्राहकांना ट्रेन प्रवासासाठी बोर्डिंग आणि गंतव्य स्थानक देखील बदलता येते.यासाठी इंग्रजी अथवा हिंदीमध्ये बुकिंग करता येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com