देशातील तसेच विदेशातील परतीच्या प्रवासाला वेग

Plane-Journey
Plane-Journey

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या कामगारांना आणि इतर नागरिकांना त्यांच्या घरी  नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे वेगाने हालचाली करत आहेत. एक मेपासून रेल्वेने ''श्रमिक स्पेशल'' गाड्यांच्या ३५० फेऱ्यांद्वारे सुमारे ३.६ लाख कामगारांना त्यांच्या गावी नेऊन सोडले आहे.

या प्रत्येक रेल्वेगाडीला २४ डबे असून एक डब्याची प्रवासी क्षमता ७२ ची असली तरी सुरक्षितता म्हणून त्यातून केवळ ५४ जणांनाच परवानगी दिली जात आहे.

गुजरातमधून सर्वाधिक गाड्या
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एका रेल्वेच्या फेरीसाठी रेल्वे प्रशासनाला ८० लाख रुपये खर्च येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार ८५ : १५ या प्रमाणात हा खर्च उचलणार आहेत. श्रमिक स्पेशल रेल्वे सुरू झाल्यापासून सर्वाधिक गाड्या गुजरातमधून आणि त्यांनंतर केरळमधून सुटल्या आहेत. बहुतेक गाड्यांचा अंतिम थांबा बिहार आणि उत्तर प्रदेश येथेच आहे.

भारतीय परिचारिका दुबईत
दुबई - संयुक्त अरब अमिरतीमध्ये (यूएई) कोरोनाचे रुग्ण वाढल्याने त्यांच्या आरोग्य सेवेवर आलेला ताण कमी करण्यासाठी ८८ भारतीय परिचरिकांची पहिली तुकडी आज दुबईत दाखल झाली. ‘यूएई’मध्ये रुग्णसंख्येने १७ हजारांचा टप्पा पार केला आहे. 

‘यूएई’हून भारतीय परतले
लखनौ - संयुक्त अरब अमिरतीमध्ये अडकून पडलेले १८२ भारतीय आज शारजा येथून एअर इंडियाच्या विमानातून लखनौ येथे आले. या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

अमेरिकेतील भारतीय परतणार
न्यूयॉर्क - लॉकडाउनमुळे अमेरिकेत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून न्यूजर्सी येथून एअर इंडियाचे एक विमान आज उड्डाण करणार आहे. हे विमाने मुंबई आणि अहमदाबाद येथे उतरणार आहे. सॅनफ्रान्सिस्को येथूनही काल एक विमानाने भारताकडे उड्डाण केले. '' वंदे भारत'' अभियानांतर्गत केंद्र सरकार आणखी पाच विमान फेऱ्यांद्वारे आपल्या नागरिकांना परत आणणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com