मराठीच्या अभिजात दर्जासाठी हालचालींना वेग; दिल्लीत भेटीगाठी

बैठकीदरम्यान दोन्ही मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती
Marathi Language_Subhash Desai
Marathi Language_Subhash Desai

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जासाठी (Marathi Language) हालचालींना आता वेग आला आहे. त्यासाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री किसन रेड्डी यांची दिल्लीतील परिवहन भवन इथं भेट घेतली. याविषयी बैठकीत दोन्ही मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.(Speed up movements for Marathi Elite language status Subhash Desai meets Union Minister)

Marathi Language_Subhash Desai
Kirit Somaiya : संजय राऊतांच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा

मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी केवळ सोपस्कर बाकी असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यानी दिली. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई आज (सोमवारी) दिल्ली दौऱ्यावर आले आहेत.

Marathi Language_Subhash Desai
'तेलंगणा शिवसेना भाऊ-भाऊ अन्...', नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

देसाई हे दिल्लीत केंद्रीय संस्कृती मंत्री किशन रेड्डी यांच्यासह संसदीय व संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबतच दिल्लीतील मराठी भाषा विषयाच्या इतर अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

Marathi Language_Subhash Desai
साहाने चॅट उघड करताच गांगुलीचा मोठा भाऊ म्हणाला 'चूक' केलीस

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करावा व त्यासाठीची घोषणा करावी, अशी विनंती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई करणार आहेत. केंद्रीय मंत्री मेघवाल यांना महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत आणि मराठी कलाकार अशा अनेक मान्यवरांची स्वाक्षरी असलेले विनंतीपत्र सुपूर्द केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com