शेतात उगवली 'कोरोना' सदृश्य 'काकडी'; शेतकरीही झाले हैराण I Coronavirus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cucumber

दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला होता.

शेतात उगवली 'कोरोना' सदृश्य 'काकडी'; शेतकरीही झाले हैराण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भुवनेश्वर : ओडिशातील (Odisha) एका गावात कोरोना सदृश्य (Coronavirus) रूपातील काकडीनं (Cucumber) पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. नबरंगपूर (Nabarangapur) जिल्ह्यातील सरगुडा गावातील (Saraguda Village) शेतकऱ्यानं या काकडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ही काकडी पाहण्यासाठी आता लोकांची गर्दी जमू लागलीय. यापूर्वी शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू कसा आहे आणि तो कसा दिसतो याबाबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्या फोटोतील कोरोना विषाणूसारखीच ही काकडी देखील असल्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतेय.

दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना महामारीच्या सुरुवातीला शास्त्रज्ञांनी विषाणूशी संबंधित एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून कोरोना किती धोकादायक आहे, हे सर्वांना कळलं. शास्त्रज्ञांनी शेअर केलेल्या छायाचित्रात हा विषाणू बॉलसारखा होता आणि त्यावर काटे होते. या विशेष संरचनेचा उपयोग केवळ विषाणू समजून घेण्यासाठीच नाही, तर लोकांना कोरोनाबद्दल जागरूक करण्यासाठी देखील केला गेला. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर ओडिशात एक काकडी सापडलीय, जी या कोरोना विषाणूसारखीच दिसतेय.

हेही वाचा: 'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

ओडिशाच्या नबरंगपूरमधील सरगुडा गावातील एका शेतकऱ्यानं दावा केलाय, की त्याच्या शेतात अशी काकडी उगवलीय, जी दिसायला कोरोनाच्या प्रतिरूपासारखी आहे. त्यांच्या शेतात उगवलेली काकडी गोलाकार असून काकडीच्या आजूबाजूला काट्यासारखा आकार आहे. सुरगुडा गावचे शेतकरी चंद्रा पुजारी यांनी सांगितलं, की काही कामानिमित्त मी सरगुडा गावात गेलो असता, मला ही काकडी दिली. त्यानंतर मी या काकडीचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि तो प्रचंड व्हायरल देखील झाला, असं त्यांनी सांगितलं.

loading image
go to top