esakal | ‘स्थायी’तील वादावरून राहुल यांचा पत्रप्रपंच
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

संरक्षण विषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत काल झालेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याविरुद्ध लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

‘स्थायी’तील वादावरून राहुल यांचा पत्रप्रपंच

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - संरक्षण विषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत काल झालेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याविरुद्ध लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

भारत बांग्लादेशचा सच्चा दोस्त; शिखर परिषदेत PM मोदी आणि PM शेख हसीना यांचा सहभाग

संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत सैनादलांचा गणवेश, पदकांवर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी आक्षेप घेऊन यावर सेनाधिकाऱ्यांशी बोलण्याऐवजी सैन्यक्षमता, व्यूहरचना, सेनादलांची गरज यावर चर्चा करावी असे मत मांडले होते. त्यावर समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांनी बोलण्यास परवानगी नाकारल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला होता.  राहुल गांधींनी पत्रात म्हटले आहे, की समितीच्या अजेंड्याबाहेरील विषय उपस्थित करण्याचा सदस्यांचा अधिकार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या म्हणण्याशी समिती सहमत नसेलही. परंतु, अध्यक्षांनी यावर एकाही सदस्याला बोलू दिले नाही, ही दुःखद बाब आहे. लोकसभाध्यक्ष हे सभागृहाचेपालक असल्याने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राहुल गांधींनी केली. चीनने बळजबरीने भारतीय भूभाग बळकावल्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे आपले २० जवान हुतात्मा झाले आहेत. यासारखे अनेक गंभीर विषय चर्चेला येणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Farmers Protest : केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र PM मोदींनी केलं ट्विट; म्हणाले...

राहुल स्वतःला ‘स्थायी’पेक्षा मोठे मानतात 
‘‘स्थायी समितीच्या बैठकीतून ‘वॉकआउट’ करणारे कॉँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःला संसदीय समितीपेक्षा मोठे मानतात,’’ असा प्रतिहल्ला भाजपने चढविला आहे. संसदीय समिती अशा प्रकारे विरोध करण्याचे ठिकाण नव्हे, हे राहुल गांधींना समजत नसावे, असे टीकास्त्र भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोडले आहे. या समितीच्या गेल्या दीड वर्षात १४ बैठका झाल्या, त्यातील जेमतेम दोन बैठकांना राहुल गांधी हजर राहिले होते याकडे लक्ष वेधून जावडेकर म्हणाले, की स्वतः बैठकांना दांड्या मारायच्या व नंतर सरकार व साऱ्या व्यवस्थेला दोष द्यायचा ही काय पद्धत आहे?

Edited By - Prashant Patil

loading image