लॉकडाऊन वाढणार? इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली

Migrant_Workers
Migrant_Workers

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. आणि येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, इतर राज्यात अडकलेल्या आपल्या लोकांना आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेश राज्य सरकारने आपल्या राज्यातील नागरिक आणले देखील. तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर ही राज्ये त्या तयारीमध्ये आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
लॉकडाउन वाढणार?
३ मे नंतरही लॉकडाउन चालू ठेवण्याची अनेक राज्यांची इच्छा आहे. स्थलांतरित कामगारांना बोलावले जात आहे, कारण त्यांना त्यांच्या राज्यातच ठेवले जावे. सावध पावले उचलत आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटविण्यात यावा, असाही काही राज्यांचा विचार आहे. जर परप्रांतीय कामगार बाहेर असताना लॉकडाऊन वाढला, तर परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते. कारण गेल्या महिनाभराच्या कालावधीत असे प्रकार दिसून आले आहेत.

केंद्र सरकारशी चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारशी बोलणे सुरू आहे. आम्हाली सध्या कोणत्याही प्रकारची गर्दी नको आहे, त्यामुळे रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

राज्य सरकारांच्या हालचाली 
जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी सांगितले की, सोमवारी (ता.२७) कोटामधून ३७६ काश्मिरी विद्यार्थ्यांना बसद्वारे आणले जाणार आहे. याआधी जैसलमेर आणि इतर ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना जम्मू-काश्मीरमध्ये आणण्यात आले आहे. 

नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबी लोकांचा एक जत्था रविवारी पंजाबकडे रवाना झाला आहे. गुजरातमध्ये अडकलेल्या मध्य प्रदेशच्या सुमारे २४०० कामगारांना ९८ बसमधून लॉकडाऊन सुरू असतानाच परत आणण्यात आले आहे. तसेच राजस्थानमधूनही कामगारांना आणले जात असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. 

पीएम-सीएम मीटिंगमध्ये ठरणार
शनिवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावली होती. यामध्ये इतर राज्यात अडकलेल्या कामगारांना आपल्या राज्यात आणण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशा सूचना मांडण्यात आल्या होत्या.

पंजाब, गुजरात, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी याबाबत विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.२७) पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या मीटिंगमध्ये देशव्यापी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com