PM मोदींनी उद्घाटन केलेल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'वर पुन्हा दगडफेक; खिडक्यांच्या फुटल्या काचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
Vande Bharat Express
Vande Bharat Expressesakal
Summary

याआधीही या हायस्पीड ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. हावडा ते न्यू जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली.

Vande Bharat Express : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीचं प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. बंगालमध्ये पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडलीये. दगडफेकीत रेल्वेच्या खिडक्यांचं नुकसान झालंय.

याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारतच्या C14 कंपार्टमेंटवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळं त्याची काच फुटली. दगडफेकीनंतर रेल्वेला बराच वेळ बोलपूर रेल्वे स्थानकावर (Bolpur Railway Station) थांबवावं लागलं.

Vande Bharat Express
VIDEO : राष्ट्रगीत सुरू असतानाच 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी केली पँटेत लघवी; 6 पत्रकारांना अटक

याआधीही या हायस्पीड ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. हावडा ते न्यू जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली. दगडफेकीमुळं हायस्पीड ट्रेनच्या C3 आणि C6 डब्यांच्या काचा फुटल्या. आरपीएफ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीदेवा भागाजवळ ट्रेन न्यू जलपायगुडीकडं जात असताना खिडक्या खराब झाल्याचं आढळलं.'

Vande Bharat Express
Air India विमानात चाललंय काय? दारूच्या नशेत प्रवाशानं 8 वर्षांच्या मुलीसोबत केलं होतं 'हे' घाणेरडं कृत्य

3 जानेवारी रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी रेल्वे कायद्याच्या कलम 154 अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. ट्रेन न्यू जलपाईगुडीच्या दिशेनं जात असताना काही लोकांनी ट्रेनवर दगडफेक केली, त्यामुळं ट्रेनच्या C3 आणि C6 डब्यांच्या काचा फुटल्या.

Vande Bharat Express
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत समर्थकांनी काढले शर्ट; डान्सचा Video तुफान व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 1 आणि 2 जानेवारी रोजी कोणतीही दगडफेक झाली नसल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, 'पश्चिम बंगालमध्ये नव्हे तर बिहारमध्ये वंदे भारतावर दगडफेक झाली. खोटेपणा पसरवण्याचं काम करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com