अभिमानास्पद! शिवांगी बनली नौदलातील पहिली महिला पायलट

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

शिवांगीचे प्रशिक्षण आजच पूर्ण झाले आहे व ती आजपासूनच सेवेत रूजू होईल व फिक्स्ड विंग सर्व्हिलांस डोर्नियर विमानातून गगनभरारी घईल.

कोची : भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे, त्याचे कारणही खास आहे. आज भारताला नौदलातील पहिली महिला पायलट मिळाली आहे. सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट ठरली आहे. त्यामुळे आजचा दिवस हा देशासाठी हा अत्यंत अभिमानास्पद मानला जात आहे. शिवांगीचे प्रशिक्षण आजच पूर्ण झाले आहे व ती आजपासूनच सेवेत रूजू होईल व फिक्स्ड विंग सर्व्हिलांस डोर्नियर विमानातून गगनभरारी घईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

ऑपरेशन ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर शिवांगी म्हणाली की, 'माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, अखेर आज मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. तिसऱ्या स्तराच्या प्रशिक्षणासाठी मी उत्सुक आहे.' शिवांगी तिचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही. ती भारताच्या नौदलातील पहिली महिला पायलट ठरली आहे. पुरूषांचे वर्चस्व असलेल्या नौदलात पहिली महिला पायलट होणं, सोपी गोष्ट नाही आणि हिच गोष्ट शिवांगीने खरी करून दाखवली आहे.

"मोदी 2.0'ची दमदार कामगिरी 

शिवांगीचा हवाई प्रवास
शिवांगी मूळची बिहारच्या मुजफ्फरपूरची आहे. सुरवातीच्या प्रशिक्षणानंतर मागील वर्षी तिची नौदलात भरती झाली. भारतीय नौदल अकादमीच्या एझिमालामध्ये 27 एनओसी कोर्सच्या स्वरूपात एसएससी (पायलट) म्हणून ती काम करू लागली. शिवांगीने नौसेनेत येण्यापूर्वी हवाई दलाचे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात तिला नौदलातील के पिलाटस पीसी - 7 या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊन सब लेफ्टनंट पदानंतर आता पायलट झाली आहे. 

यापूर्वी भारतीय नौदलात कोणतीही महिला पायलट म्हणून रूजू नव्हती. नौदलातील महिला एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकारी व विमानात पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम करतात. आजपर्यंत एकाही महिलेने नौदलातील विमानाचे उड्डाण केले नव्हते. नौदलातील विमानाचे उड्डाण करणार शिवांगी पहिली महिला असेल.
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sub Lieutenant Shivangi today became the first naval women pilot