बाबराची चूक दुरुस्त करावी लागेल;  हिंदू पक्षकारांची सुप्रीम कोर्टात भूमिका

supreme court ayodhya case hearing hindu counsellor statement
supreme court ayodhya case hearing hindu counsellor statement

नवी दिल्ली : विजेत्याच्या भूमिकेतील बाबराने अयोध्येतील राममंदिराच्या जागी मशीद उभारून ऐतिहासिक चूक केली होती, ही चूक आता दुरुस्त करणे गरजेचे असल्याची भूमिका हिंदू पक्षकारांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवादाच्या खटल्याची आज न्यायालयात सुनावणी झाली असता हिंदू पक्षकारांकडून उपरोक्त युक्तिवाद करण्यात आला.

बाबरची ऐतिहासिक चूक
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली, या वेळी माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधीज्ञ के. पराशरन यांनी हिंदू पक्षकारांची बाजू मांडली. अयोध्येमध्ये आजही खूप साऱ्या मशिदी आहेत, तेथे जाऊन मुस्लिम बांधव प्रार्थना करू शकतात, पण हिंदू मात्र भगवान रामाच्या जन्मस्थळामध्ये बदल करू शकत नाहीत, असेही पराशरन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पराशरन हे न्यायालयामध्ये महंत सुरेश दास यांची बाजू मांडत असून, सुन्नी वक्‍फ बोर्डाने दाखल केलेल्या खटल्यामध्ये ते प्रतिवादी आहेत. भारत जिंकल्यानंतर बाबराने ऐतिहासिक चूक केली. त्याने राम जन्मभूमीच्या ठिकाणीच मशीद उभारून आपले स्थान कायद्यापेक्षाही मोठे केले, असे पराशरन यांनी नमूद केले.

मोदी अमित शहांना झोपेतही पवार दिसत असतील

घटनापीठाचेही सवाल
ज्या घटनापीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली, त्या पीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नाझीर यांचा समावेश आहे. या वेळी घटनापीठाने हिंदू पक्षकारांना या खटल्याच्या अनुषंगाने कायदेशीर प्रश्‍नही विचारले. एकदा मशीद उभारण्यात आली, की ती कायमस्वरूपी मशीदच राहते, तुम्ही याला पाठिंबा देता का, असा प्रश्‍न घटनापीठाने विचारला असता पराशरन म्हणाले, की मी याला पाठिंबा देत नाही. मी फक्त एवढेच म्हणेल एकदा मंदिर उभारले की ते तेथे कायमस्वरूपी मंदिरच राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com