कॉमेडियन फारुकीला हंगामी जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 

पीटीआय
Saturday, 6 February 2021

कॉमेडियन मुनावर फारुकी याल आज सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला. न्या. आर.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी मध्यप्रदेश सरकारला देखील नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली - धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सध्या मध्यप्रदेशात तुरुंगवास भोगणारे कॉमेडियन मुनावर फारुकी याल आज सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला. न्या. आर.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी मध्यप्रदेश सरकारला देखील नोटीस बजावली आहे.

'कृषी कायदे दिल्लीत नव्हे, मुंबईत तयार झाले'; दिग्विजय सिंहांचा रोख कुणाकडे?

तत्पूर्वी उच्च न्यायालयाने मुनावर यांना नियमित जामीन देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फारुकी याच्या याचिकेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली. यावेळी  खंडपीठाने फारुकीविरोधात बजावण्यात आलेल्या प्रत्यक्ष हजर राहण्याच्या वॉरंटला देखील स्थगिती दिली आहे.

 'आंदोलक शेतकरी काय पाकिस्तान-चीनमधून आले आहेत का?' उपमुख्यमंत्री अजित पवार मोदी सरकारवर बरसले​

फारुकी याच्याविरोधात उत्तरप्रदेशात देखील खटले भरण्यात आले होते. १ जानेवारी रोजी भाजप आमदाराच्या मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर फारुकीला पोलिसांनी अटक केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या इंदूरमधील कार्यक्रमात फारुकी याने हिंदू देवदेवता आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणात फारुकी याच्यासह अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी २८ जानेवारी रोजी न्यायालयाने फारुकीला जामीन देण्यास नकार दिला होता.

 "बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का?", अजित पवारांचा बॉलिवूडकरांना सवाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court Comedian Farooqi granted interim bail