
कोल्हापुरातल्या नांदणी इथून माधुरी हत्तीण गुजरातच्या वनतारा इथं नेल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर वनताराने कोल्हापुरात येऊन हत्तीण नांदणीला नेण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर नांदणी येथील माधुरी हत्ती बाबत पिटीशन दाखल करून घेण्यात येणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. मात्र या प्रकरणी सुनावणी लांबणीवर पडली आहे.