
शिक्षकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला. शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण करणं आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना सेवेत कायम ठेवता येईल किंवा त्यांना पदोन्नती मिळेल. निवृत्तीला फक्त पाच वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच टीईटीमधून सूट दिली जाईल.