esakal | कोरोना रुग्णाच्या घरासमोर पोस्टर लावू नका; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

सुप्रिम कोर्टाने आज बुधवारी कोरोना व्हायरस प्रतिबंध नियमांसंबंधी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. 

कोरोना रुग्णाच्या घरासमोर पोस्टर लावू नका; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टाने आज बुधवारी कोरोना व्हायरस प्रतिबंध नियमांसंबंधी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर तसेच साईनेज लावू नयेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून सुप्रिम कोर्टाने बुधवारी आदेश असे दिले आहेत की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांच्या घराबाहेर कोणतेही चेतावणी निर्देशक पोस्टर लावू नयेत. केंद्र सरकारने दिलेल्या दिशानिर्देशात अशाप्रकारे पोस्टर लावण्याच्या कोणत्याही प्रकाराचा उल्लेख नाही, असे सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘केंद्राने आपल्या नियमावलीत किंवा मार्गदर्शक सूचनांमध्ये अशाप्रकारे कोरोना रुग्णाच्या घरावर आणि घराबाहेर पोस्टर लावण्यासंदर्भात कुठेही उल्लेख केलेला नाहीय. मात्र, आपत्ती निवारण अधिनियमांतर्गत अधिकाऱ्यांमार्फत विशिष्ट प्रकरणातच कोरोना रुग्णाच्या घरासमोर सूचना लावली जाऊ शकते,’ असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.  न्यायमूर्ती आर. एस. रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या पीठाने हा आदेश दिला आहे. पीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की केंद्राने याबाबत आधीच दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळए राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात याप्रकारचे पोस्टर्स लावले जाऊ नयेत.

हेही वाचा - कोरोना लशीच्या आढाव्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर
रुग्णाच्या घरावर अशाप्रकारे पोस्टर लावण्याचा प्रकार बंद करण्यासाठी देशव्यापी दिशानिर्देश जारी करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने अशाप्रकारचे आदेश दिले आहेत.

loading image