सरन्यायाधीशांचा शपथविधी होणार ऐतिहासिक, ब्राझीलसह ७ देशांचे न्यायमूर्ती राहणार उपस्थित; पहिल्यांदाच 'असं' घडणार

Chief Justice Of India : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार आहे. राष्ट्रपती भवनात २४ नोव्हेंबर रोजी या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून परदेशातील न्यायमूर्तीही उपस्थित राहणार आहेत.
Surya Kant Sworn In as CJI on Nov 24 in Ceremony With Global Judge Representation

Surya Kant Sworn In as CJI on Nov 24 in Ceremony With Global Judge Representation

Esakal

Updated on

भारताचे नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात हा सोहळा अभूतपूर्व असा ठरणार आहे. २४ नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांचे प्रमुख न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित असणार आहेत.
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पातळीवर परदेशातील न्यायसंस्थांचे प्रतिनिधी भारताच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com