

नवी दिल्लीः २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला आज कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाणार आहे. राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातल्या अनेक एजन्सीच्या टीम सध्या अमेरिकेमध्ये आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्याला लवकरच भारतात आणलं जाईल, असं सांगितलं जातंय.