वाळूसाठी उत्खनन करताना आढळले मंदिर...

a temple like structure was unearthed during sand mining in Penna river at ap
a temple like structure was unearthed during sand mining in Penna river at ap

हैदराबाद (आंध्र प्रदेश) : नेल्लोरमध्ये नदीच्या काठी वाळूसाठी उत्खनन सुरू असताना पुरातन मंदिर आढळून आले आहे. हे ऐतिहासिक शिव मंदीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मंदिर आढळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

पेरुमलापाडू गावाजवळील पेन्ना नदीच्या पात्रात नागरिक वाळूसाठी उत्खनन करत होते. खोदकाम करत असताना  मंदिराचा वरचा भाग दिसला आहे. यानंतर चारही बाजूंनी माती काढण्याचे काम सुरू केल्यानंतर मंदिर दिसून आले. हे मंदिर २०० वर्ष जुने असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. भगवान परशुराम यांनी 101 मंदिरे बांधली होती. त्यातील एक मंदिर पेन्ना नदीच्या काठावर बांधले होते. सध्या या मंदिराची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ओडिसामध्येही नदीमध्ये मंदिर आढळले होते. नागरिकांनी नदीच्या आतून 500 वर्ष जुने भगवान विष्णूचे मंदिर बाहेर येताना पाहिले. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या पुरातनशास्त्रज्ञांच्या पथकाने सांगितले होते की, हे मंदिर त्यांनीच शोधले आहे आणि या मंदिराची रचना पाहिल्यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की ते 15 किंवा 16व्या शतकातील असेल. या मंदिरात गोपीनाथ यांची मूर्ती बसवण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com