Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा शपथविधी १० वाजता, राहुल गांधीसह मान्यवरांची उपस्थिती; ज्योतिषांनी शपथविधीची वेळ बदलली

Tamil Nadu political news : तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय आज सकाळी १० वाजता शपथ घेणार आहेत. राहुल गांधींसह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
Thalapathy Vijay Oath Ceremony rahul gandhi in tamilnadu

Thalapathy Vijay Oath Ceremony rahul gandhi in tamilnadu

esakal

Updated on

Rahul Gandhi at Vijay oath ceremony : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज सकाळी दिल्लीहून चेन्नईकडे रवाना झाले. थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. तमिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय उलथापालथ घडवत विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला. VCK आणि IUML यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता विजय आज सकाळी १० वाजता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत राज्यपाल आर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com