व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून महिलेनं बनवला अश्लील व्हिडिओ अन् नंतर...| Blackmailing through WhatsApp Video Call | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blackmailing WhatsApp video call
व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून महिलेनं बनवला अश्लील व्हिडिओ अन् नंतर...| Blackmailing through WhatsApp Video Call

व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून महिलेनं बनवला अश्लील व्हिडिओ अन् नंतर...

काही दिवसांपूर्वी एका महिलेने नोएडा येथे एका सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल केला होता. यादरम्यान महिलेने अश्लील व्हिडिओ बनवून स्क्रीन रेकॉर्ड केली. आता संबंधित व्यक्तीला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले जात आहे. यामुळे व्यथित होऊन पीडित व्यक्तीने नोएडा सायबर क्राइम पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (The woman made a pornographic video by calling WhatsApp and then started blackmailing in Noida)

हेही वाचा: पतीसोबत नव्हे प्रियकरासोबत राहायचं होतं; पत्नीनंच काढला काटा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-39 पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला होता. त्याने कॉल उचलला तेव्हा तो एका महिलेचा कॉल होता. स्क्रीन रेकॉर्डरच्या मदतीने त्या महिलेने अश्लील व्हिडिओ बनवले. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर त्याला दुसऱ्या नंबरवरून कॉल आला.

हेही वाचा: ‘मला संबंध ठेवायला आवडत नाहीत’; पहिल्याच दिवशी पत्नीने केले स्पष्ट

फोन करणाऱ्याने व्यक्तीने तो अधिकारी असल्याचं सांगितले तसेच त्याचा व्हि़डीओ व्हायरल करणार असल्याचं सांगितले. तसेच यानंतर सीबीआय त्याची चौकशी करणार आहे, असंही सांगितले. या घटनेनंतर संबंधित व्यक्ती खूपच अस्वस्थ झाली. त्यांनी तत्काळ नोएडा सायबर क्राइम पोलिस स्टेशनला याची माहिती दिली.

Web Title: The Woman Made A Pornographic Video By Calling Whatsapp And Then Started Blackmailing In Noida

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top