भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत या नेत्यांची लागणार वर्णी; कोणत्या ते पहा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 19 July 2020

संसदीय मंडळातील मुख्यमंत्री?
भाजपच्या ११ सदस्यीय संसदीय मंडळातील तीन जागा सध्या रिक्त आहेत. सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार यांचे निधन झाल्याने व वेंकय्या नायडू उपराष्ट्रपती पदावर गेल्याने ज्या जागा रिक्त आहेत त्यावरील एकावर फडणवीस यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या संसदीय मंडळावरील नियुक्तीचेही काही नियम आहेत. आजीचे माजी झालेले सर्वच मुख्यमंत्री यात असावेतच, असा नियम नाही. दरम्यान स्वराज यांच्या जागी रिक्त झालेल्या महिला सदस्यांच्या जागेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रहाटकर आदींच्या नावांची चर्चा आहे.

नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांची वर्णी लागण्याची चर्चा दिल्लीत जोरात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या सर्वांत शक्तीशाली अशा संसदीय मंडळात नियुक्ती होण्याची कुजबुज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील एका नेत्याने आज दिल्लीत निवडक पत्रकारांशी ‘गप्पा’ मारल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र पक्षाध्यक्षांच्या गोटातून समजलेल्या माहितीनुसार नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा या महिन्यात होण्याची शक्‍यता अंधूक असून ती ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास होऊ शकते. 

कँसरने पीडित 85 वर्षीय रुग्ण आणि त्याच्या पत्नीने कोरोनावर केली मात

विनोदाचा भाग म्हणजे ताज्या चर्चेत ज्या विनोद तावडे यांचे नाव चालविण्यात आले ते सध्याही राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेतच. भाजप संकेतस्थळावरील कार्यकारिणी यादीत एकनाथ खडसे यांच्यानंतर व पी. राधाकृष्णन यांच्या आधी तावडे यांचे नाव दिसत आहे.

मोदी सरकारच्या भ्याडपणामुळे भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल- राहुल गांधी

भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने अमित शहा यांना गृहमंत्री केल्यावर जे. पी. नड्डा यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून भाजपच्या बहुप्रतीक्षित ‘टीम जे. पी. नड्डा’ ची घोषणा होण्याची चर्चा वारंवार सुरू आहे. 
मात्र कोरोना व चीनच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार आगामी संसद अधिवेशनाच्या पुढेमागे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली तर त्याच सुमारास कार्यकारिणीचीही घोषणा होईल. मुंडे यांना महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

चक्क रोबोट कोरोनाग्रस्तांच्या सेवेत; परदेशातला नव्हे हा देशातल्या रुग्णालयातील सीन

संसदीय मंडळातील मुख्यमंत्री?
भाजपच्या ११ सदस्यीय संसदीय मंडळातील तीन जागा सध्या रिक्त आहेत. सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार यांचे निधन झाल्याने व वेंकय्या नायडू उपराष्ट्रपती पदावर गेल्याने ज्या जागा रिक्त आहेत त्यावरील एकावर फडणवीस यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या संसदीय मंडळावरील नियुक्तीचेही काही नियम आहेत. आजीचे माजी झालेले सर्वच मुख्यमंत्री यात असावेतच, असा नियम नाही. दरम्यान स्वराज यांच्या जागी रिक्त झालेल्या महिला सदस्यांच्या जागेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रहाटकर आदींच्या नावांची चर्चा आहे.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These leaders will have a role in the new BJP national working committee